ज्वारी, ओट्स आहारात असणे तब्येतीला फायद्याचे

    28-Oct-2026
Total Views |

Oats 
मुंबई, 27 ऑ्नटाेबर (आ.प्र.) :
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीचा आणि अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयींचा आपल्या पचनसंस्थेच्या आराेग्यावरही परिणाम हाेऊ शकताे. हॅाटेलमध्ये साेडा टाकलेले पदार्थ खाणे त्याचबराेबर भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने अनेक वेगवेगळे त्रास हाेतात. आजकालची युवा पिढी स्ट्रिटवर मिळणारे पदार्थ खाणे पसंत करते, पण त्यामुळे आजारांना देखील लवकर माणूस बळी पडताे. सातत्याने हॅाटेल वा स्ट्रिटवर मिळणारे पदार्थ खाल्ले, तर गॅस बद्धकाेष्ठता, पाेट फुगणे व अपचन यांसारख्या समस्या त्रासदायक ठरू शकतात. अशा परिस्थितीत, आपल्या आहारात फायबरयुक्त संपूर्ण धान्यांचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.
 
फायबरयुक्त पदार्थांचा आहारामध्ये समावेश केला, तर ते पचनसंस्थेला उत्तम प्रकारे कार्य करण्यास आणि आतड्यांचे आराेग्य राखण्यास मदत करतात. या लेखामध्ये तुम्हाला फायबर काेणत्या पदार्थांमध्ये असते आणि त्याचा फायदा तुम्हाला कसा हाेताे, यासंदर्भात सांगणार आहाेत.
 
ओट्स : निराेगी नाश्त्यासाठी ओट्स हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामध्ये फायबर, विशेषतः बीटा-ग्लुकन असते, जे पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरू शकते. हे फायबर शाैचातील व आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियांचे पाेषण करण्यास मदत करते. नाश्त्यामध्ये ओट्स दूध, दही वा फळांसाेबत खाल्ले जाऊ शकतात.
 
ज्वारी : ज्वारी हे फायबर व अनेक आवश्यक पाेषक तत्त्वांनी समृद्ध असलेले एक पाैष्टिक संपूर्ण धान्य आहे. त्याचे सेवन केल्याने तुम्हाला जास्त वेळ पाेट भरल्यासारखे वाटण्यास मदत हाेऊ शकते. ज्वारीमधील फायबर बद्धकाेष्ठतेपासून आराम देते आणि निराेगी पचनसंस्था राखण्यास मदत करू शकते.