टाइप टू डायबेटिस समजून घेताना

    27-Oct-2026
Total Views |

Diabetes 
‘टाइप टू’ डायबेटिस हा अनुवांशिक असून ताे बदलत्या जीवनशैलीमुळेही हाेऊ शकताे. विशेष म्हणजे 50 टक्के पेशंटमध्ये काेणत्याही प्रकारची प्राथमिक लक्षणे दिसून येत नाहीत. जगभरातील एकूण पेशंटपैकी 95 टक्के पेशंटनाच टाइप टू प्रकारच्या डायबेटिसने ग्रासलेले आहे.
टाइप टू डायबेटिसमध्ये स्वादूपिंडात अनेकदा याेग्य प्रमाणात इन्सुलिनची निर्मिती हाेते, मात्र शरीरातील पेशी या कृतीत अडथळा आणते. त्यामुळे रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढते. ही स्थिती अनेकदा वजन वाढल्यामुळे निर्माण हाेत असली तरीही ही समस्या आहार नियंत्रित करून साेडवता येते. साधारणपणे या आहाराला गाेळ्यांच्या स्वरूपात औषधाची जाेड दिली जाते. ज्यामुळे स्वादुपिंडातील पेशी सक्रीय हाेतात आणि अधिक इन्सुलिनची निर्मिती करतात.
 
टाइप टू डायबेटिसमुळे हृदयराेग, पायांच्या नसांवर आघात, किडनी फेल्युअर, डाेळ्यांचे विकार हाेणे सर्वांनाच परिचित आहे. परंतु, प्राैढ मुलींमध्ये माेठ्या प्रमाणात पाॅलिसिस्टिक ओव्हरी सिड्राेंमचा आजार असल्याचे दिसून आले आहे. हा आजार हाेण्याचा ङ्गटाइप टूफ डायबेटिसशी संबंध आहे. ताे विशेषता लठ्ठ किंवा जास्त वजन असलेल्या मुलींमध्ये आढळताे. त्यामुळे शरीरातील हार्माेनल प्रक्रियेत बदल झाल्याने अशा मुलींना लठ्ठपणा, चेहऱ्यावर पुरुषांप्रमाणे केस येणे, वंधत्व आदी विकारांना सामाेरे जावे लागते.
 
याव्यतिरिक्त श्रवणदाेष, त्वचाविकारसारखे इतरही आजार हाेऊ शकतात. संशाेधनात असेही आढळून आले आहे, की ङ्गटाइप टूफ डायबेटिस असणाऱ्या पेशंटना अल्झायमरही हाेण्याची अधिक शक्यता आहे. या डायबेटिसमुळे पेशंट बरेचदा नैराश्यग्रस्त हाेतात व त्याबद्दल डाॅक्टरांना न सांगितल्याने याेग्य निदान हाेत नाही. परिणामी आजार अधिक गंभीर बनत जाताे.