चंद्रपूर, 26 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
उन्हाळ्यात वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी जंगलातील पाणवठ्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असते. मात्र, पाणवठे भरताना हाेणारा पाण्याचा अपव्यय राेखण्यासाठी आता ताडाेबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. पाण्याची पातळी कमी हाेताच पंप सुरू आणि पाणवठा भरताच पंप बंद करणारी सेन्सरआधारित स्वयंचलित यंत्रणा प्रथमच प्रायाेगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे पाण्याची नासाडी कमी हाेण्यासाेबतच भूजल संवर्धनालाही हातभार लागणार आहे.
ताडाेबात सुमारे 130 नैसर्गिक जलस्राेत आणि 350 कृत्रिम पाणवठे आहेत. कृत्रिम पाणवठ्यांपैकी अनेक ठिकाणी साैरऊर्जेवर चालणाऱ्या पंपांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाताे. गेल्या उन्हाळ्यात तीव्र उष्णता असूनही या पाणवठ्यांसाठी टँकरने पाणीपुरवठ्याची गरज भासली नव्हती. मात्र, पाणवठे भरल्यानंतरही साैरपंप सुरूच राहत असल्याने अनेकदा पाण्याचा ओव्हरफ्लाे हाेताे. पंप बंद करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष जावे लागते. जंगलात वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचा धाेका लक्षात घेता ही पद्धत वेळखाऊ आणि जाेखमीची ठरते.
नवीन यंत्रणेत पाण्याची पातळी निश्चित खालच्या मर्यादेपेक्षा कमी झाल्यास पंप आपाेआप सुरू हाेईल, तर निर्धारित वरच्या मर्यादेपर्यंत पाणी पाेहाेचताच ताे बंद हाेईल. त्यामुळे पंपांवर सतत लक्ष ठेवण्याची गरज कमी हाेईल.
परिणामी, पाण्याचा अपव्यय तसेच भूजलाचा अनावश्यक उपसाही मर्यादित करता येईल. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन ताडाेबा व्यवस्थापनाने काेअर क्षेत्राची विविध ग्रीडमध्ये विभागणी केली आहे. प्रत्येक ग्रीडमध्ये पाणवठे उपलब्ध करून देण्याचे नियाेजन असून, त्यांचे भाैगाेलिकदृष्ट्या समताेल वितरण करण्याचे उद्दिष्ट आहे. हे काम याच वर्षात पूर्ण करण्याचे नियाेजन आहे. ताडाेबाचे क्षेत्र संचालक प्रभू नाथ शुक्ला यांच्या मते, या सेन्सर यंत्रणेचा व्यापक वापर केल्यास जलसंवर्धन अधिक प्रभावी हाेईल. दुष्काळी परिस्थितीतही वन्यजीवांसाठी पाण्याची उपलब्धता करण्यासाेबतच भूजल संवर्धनाला चालना मिळेल.