स्थानकांवरील अस्वच्छतेस विभाग नियंत्रक जबाबदार : सरनाईक

    27-Oct-2026
Total Views |
 
ST
मुंबई, 26 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
एसटी बस स्थानकांवरील प्रसाधनगृहांची स्वच्छता राखण्यात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित विभाग नियंत्रकांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल. प्रवाशांना स्वच्छ, निराेगी आणि आराेग्यदायी सुविधा उपलब्ध करून देणे ही राज्य मार्ग परिवहन महामंडळाची मूलभूत जबाबदारी असून, स्वच्छतेच्या बाबतीत तडजाेड खपवून घेतली जाणार नाही, असे निर्देश परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले.
 
एसटीच्या मुख्यालयात आयाेजित स्वच्छता आढावा बैठकीत ते बाेलत हाेते. महामंडळाचे विभागप्रमुख, प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रक उपस्थित हाेते. एसटी प्रवाशांकडून दाेन रुपये स्वच्छता अधिभार आकारते. या बदल्यात प्रवाशांना स्वच्छतेच्या किमान सुविधा उपलब्ध हाेणे अपेक्षित आहे. त्यामुळे बस स्थानकांवरील प्रसाधनगृहे स्वच्छ ठेवणे, प्रवाशांच्या आराेग्याची काळजी घेणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. बस स्थानकांवरील प्रसाधनगृहांची नियमित तपासणी करावी, स्वच्छतेच्या कामावर सातत्याने लक्ष ठेवावे आणि संबंधित संस्थांकडून करारातील अटींनुसार स्वच्छता करून घ्यावी.