नाशिक, 26 ऑक्टाेबर (आ.प्र.) : अभिनंदन! तुम्ही एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे! गिनीज वर्ल्ड रेकाॅर्ड्सचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग यांनी ही घाेषणा करताच गाेदावरीचा पवित्र तीर भारत माता की जय...च्या जयघाेषाने दुमदुमून गेला.
अमेरिकेचा एकाचवेळी 303 जणांनी शंखनाद करण्याचा पूर्वीचा विक्रम मागे टाकत 517 जणांनी सामूहिक शंखनाद केल्याने नाशिकच्या नावे एका ऐतिहासिक कामगिरीची नाेंद झाली. भ्नती, श्रद्धा, सामूहिक श्नती आणि भारतीय संस्कृतीचा गाैरव अधाेरेखित करणाऱ्या या साेहळ्याने आगामी कुंभमेळ्याच्या मंगल पर्वाची आध्यात्मिक नांदी ठरली.
नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आणि अनंत विजय शंखनाद पथकाने काेजागरी पाैर्णिमेच्या पावन पर्वावर यशवंत महाराज पटांगण, गाेदाकाठ येथे या सामूहिक शंखनादाचे आयाेजन केले हाेते. पालक मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या उपक्रमात शंखनादाच्या निनादाने परिसरात चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झाले. गाेदावरीच्या तीरावर एकाचवेळी घुमलेल्या शंखध्वनीने नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवत कुंभमेळ्याच्या स्वागतासाठी नागरिकांमध्ये उत्साह निर्माण केला.
कार्यक्रमादरम्यान गिनीज वर्ल्ड रेकाॅर्ड्सचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग यांनी विश्वविक्रम नाेंदवण्याच्या प्रक्रियेची माहिती दिली. एकाचवेळी सर्वाधिक व्य्नतींनी शंखनाद करण्याचा यापूर्वीचा विक्रम 303 व्य्नतींचा हाेता. ताे माेडण्यासाठी निर्धारित नियमांनुसार त्यापेक्षा अधिक व्य्नतींनी शंखनाद करणे आवश्यक हाेते. या उपक्रमासाठी 500हून अधिक जणांनी नाेंदणी केली हाेती. सहभागींच्या नाेंदी, प्रत्यक्ष सहभाग आणि निर्धारित निकषांनुसार केलेल्या कामगिरीची पडताळणी दाेन निरीक्षकांकडून करण्यात आली. या विश्वविक्रमाबाबत महाजन यांनी नाशिककरांचे अभिनंदन केले.