नवी मुंबई, 26 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
‘नैना (नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र) परिसराच्या नियाेजनबद्ध विकासातून सुमारे 15 लाख राेजगारनिर्मितीचे उद्दिष्ट असून, त्यापैकी पाच लाख राेजगार उच्च वेतनाचे असतील. या विकासातून निर्माण हाेणाऱ्या संधींमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात येईल.
शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांना विकासाचे भागीदार बनवण्यासह आधुनिक पायाभूत सुविधा आणि सक्षम कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून तिसरी मुंबई राज्याच्या विकासाचे नवे ग्राेथ इंजिन ठरेल,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पनवेल तालुक्यातील शिरढाेण येथे नैना परिसरातील विकासकामांचे भूमिपूजन, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पूर्वेकडील जाेडणीसाठी विकसित करण्यात आलेल्या एसबीआर-9, बीआर-4, बीआर-5 आणि उरण बायपास पूल या महत्त्वपूर्ण कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे लाेकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भूधारकांना मालमत्ता पत्रकांचे वाटपही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालक मंत्री भरत गाेगावले, खासदार सर्वश्री श्रीरंग बारणे, सुनील तटकरे, अतुल पाटील, आमदार सर्वश्री निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, विक्रांत पाटील, प्रशांत ठाकूर, रवींद्र पाटील, महेश बालदी, महेंद्र दळवी, पनवेलचे महापाैर नितीन पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भाेसले, सिडकाेचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल, सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गाेयल, राजा दयानिधी, गणेश देशमुख, मुख्य प्रशासकीय अधिकारी सुरेश मेंगडे आदी उपस्थित हाेते.
नैना क्षेत्रातील जमीनधारकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकास शुल्क शून्य करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, फ्री हाेल्डसंदर्भातील कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. स्थानिक शेतकरी आणि भूमिपुत्रांना विकासाचे भागीदार बनवणे, हीच राज्य शासनाची भूमिका असल्याचेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सुनेत्रा पवार यांनीही मनाेगत व्य्नत केले.