नागपुरात बनवलेले 'नागास्त्र-२' लष्कराच्या सेवेत दाखल

जीपीएस जॅमिंगही निष्प्रभकरणाऱ्या ड्रोन प्रणालीमुळे संरक्षण दलाचे वाढणार बळ

    27-Oct-2026
Total Views |
 
Drone
नागपूर, 26 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
नागपूरस्थित साेलर डिफेन्स अँड एअराेस्पेस लिमिटेडने विकसित केलेली ‘नागास्त्र-2’ ही स्वयंचलित लक्ष्यभेदी ड्राेन प्रणाली लष्कराला सुपूर्द करण्यात आली आहे. इलेक्ट्राॅनिक युद्धाच्या प्रतिकूल परिस्थितीतही प्रभावी कामगिरी सिद्ध केल्यानंतर हे वितरण करण्यात आले.
 
नागास्त्र-2 ही लाेइटरिंग अ‍ॅम्युनिशन प्रकारातील ड्राेन प्रणाली असून, ती 25 किमीपेक्षा अधिक अंतरावरील लक्ष्यांवर हल्ला करू शकते. या प्रणालीत प्रगत इलेक्ट्राॅनिक प्रतिकारक्षमता (ईसीसीएम) तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शत्रूकडून हाेणारे जॅमिंग आणि सिग्नलची दिशाभूल करणारे स्पूफिंग यासारख्या इलेक्ट्राॅनिक हल्ल्यांचा सामना करणे शक्य हाेते. जीपीएस सिग्नल उपलब्ध नसतानाही ही प्रणाली लक्ष्याचा मागाेवा घेऊन अचूक हल्ला करू शकते, असे कंपनीचे म्हणणे आहे.
 
नागास्त्र-2मध्ये दृश्याधारित लक्ष्याचा मागाेवा घेणारे तंत्रज्ञान आणि स्वयंचलित मार्गदर्शन प्रणाली आहे. त्यामुळे स्थिर व हालचाल करणाऱ्या लक्ष्यांवर हल्ला करणे शक्य हाेते. ऑपरेटर लक्ष्य निश्चित केल्यानंतर कमीत कमी मानवी हस्तक्षेपात ही प्रणाली अचूक हल्ला करू शकते.
 
यात दिवसा आणि रात्री काम करणारी दुहेरी संवेदकयु्नत इलेक्ट्राे-ऑप्टिकल प्रणाली देण्यात आली आहे. तिच्या मदतीने चिलखती वाहने आणि अन्य लक्ष्ये शाेधणे, त्यांचा मागाेवा घेणे आणि त्यांच्यावर हल्ला करणे शक्य हाेते.
या प्रणालीमध्ये स्वदेशी बनावटीचे टँकविराेधी टँडम वाॅरहेड बसवण्यात आले आहे. स्फाेटक प्रतिक्रियाशील चिलखत (ईआरए) भेदण्यासाेबतच सुमारे 650 मिमी. जाडीच्या राेल्ड हाेमाेजिनियस आर्मर (आरएचए) भेदण्याची क्षमता या वाॅरहेडमध्ये असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
 
आधुनिक रणांगणावर चिलखती वाहनांविराेधात ही क्षमता उपयु्नत ठरू शकते. इलेक्ट्राॅनिक युद्धाच्या परिस्थितीतही कार्यक्षम राहणारी आणि लांब पल्ल्यावरील लक्ष्यभेद करू शकणारी स्वदेशी प्रणाली लष्कराला उपलब्ध झाल्याचे कंपनीने नमूद केले. नागास्त्र-2च्या तांत्रिक चाचण्या ऑगस्टमध्ये राजस्थानातील महाजन फील्ड फायरिंग रेंज येथे पूर्ण झाल्या. लष्कराने नियु्नत केलेल्या अधिकाऱ्यांच्या मंडळाने या चाचण्यांदरम्यान प्रणालीच्या कार्यक्षमतेचे आणि इलेक्ट्राॅनिक प्रतिकारक्षमतेशी संबंधित निकषांचे प्रात्यक्षिक पाहिले. त्यानंतर प्रणाली तैनातीसाठी सज्ज असल्याचे कंपनीने सांगितले.