'दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी'

    27-Oct-2026
Total Views |
 
Dushkal
मुंबई, 26 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू असून, आतापर्यंत 2 लाख 40 हजार 365 विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काचा एकही रुपया न भरता झिराे चलन सुविधेद्वारे परीक्षा अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
 
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात अडथळे येऊ नयेत, या उद्देशाने विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नये, असा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरळीतपणे व्हावी आणि पात्र विद्यार्थ्यांना सवलतीचा लाभ मिळावा यासाठी विद्यापीठे आणि परीक्षा विभागाच्या स्तरावर आवश्यक यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. या प्रक्रियेचा आढावा घेतला जात असल्याचे पाटील यांनी सांगितले.