श्री दासबोध नित्यपाठ

देवा मज कोणीच नाही। तुजवेगळे ।।२।।

    27-Oct-2026
Total Views |

RamdasSwami 
अशी माझी हीनदीन अवस्था झाली असून, आता परमेश्वरा मला तुझ्यावाचून काेणीही नाही.’’ असे म्हणून ताे देवाची करुणा भाकू लागला. आयुष्यभर देवधर्म विसरून केवळ ऐहिक सुखे मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाची म्हातारपणी अशी अवस्था हाेते, असे सांगून श्रीसमर्थ म्हणतात की, त्या वेळी त्याला आपण आयुष्य व्यर्थच घालविले, असा पश्चात्ताप हाेताे. या पश्चात्तापदग्ध माणसाची वृद्धापकाळामुळे कशी दुर्धर व दयनीय शारीरिक अवस्था हाेते त्याचे श्रीसमर्थांनी केलेले वर्णन स्पष्ट व कारुण्यजनक आहे. त्याला दिसायचे मान कमी हाेते, ऐकू येत नाही, ताेंडात दात शिल्लक नसल्याने खाता येत नाही. मान लटलटा कापते. हातापायांच्या काड्या हाेतात. कफ, वात आणि पित्त या त्रिदाेषाने ‘‘वृद्धपणी ठाकून आली अवकळा’’ काेणीही सखेसाेबती, मुलेबाळे, नातेवाईक काळजी घेण्याला नसतात आणि नकाे हे जगणे असे हाेऊन जाते. पण, तरीही मरण मागूनही येत नाही.कथानायकाच्या हीनदीन अवस्थेवरच चार समासांत चाललेली ती कथा श्रीसमर्थ पूर्ण करतात.
 
संपूर्ण विवरणाने भरलेल्या दासबाेधात ही एकमेव कथा आहे आणि तीही नेहमीच्या श्रीसमर्थांच्या लिखाणापेक्षा थाेडी वेगळी आहे. मात्र तिच्यात अव्वल कथाकथनाचे (ॠीशरीं ीीेीूं ींशश्रश्रळपस) सर्व गुण प्रत्ययाला येतात. थाेडीशी सत्यनारायणाच्या पाेथीप्रमाणे आयुष्याचे अनेक चढउतार व सुखदु:खांची वळणे असलेली ही कथा सांगण्यामागे त्यांचा उद्देश मानवी जीवनाची धडपड स्वार्थाच्यासाठीच जर केली, तर ती शेवटी कशी व्यर्थ ठरते आणि दु:खच देते हे दाखविणे हाच आहे. ताे जाणून त्यातून आपण बाेध घेतला पाहिजे. ऐहिक आणि देहाचे सुख हे खरे सुख नाही. विषयवासनांवर विवेकाने नियंत्रण करून, परमेश्वराची भक्ती करून आत्मप्राप्तीतच खरे सुख आहे हे आपण जाणले पाहिजे असा त्यांचा उपदेश आहे!
 
- प्रा. अरुण गाेडबाेले,
माे. 9822016299