नाशिक, 25 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांसाठी हेलिकाॅप्टर सेवा सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने उभारलेल्या नव्या हेलिपॅड सुविधेमुळे मुंबई, पुणे, सुरत, वलसाड यासह विविध शहरांतील भाविकांना थेट त्र्यंबकेश्वरला पाेहाेचून ज्याेतिर्लिंगाचे दर्शन घेणे शक्य हाेईल. खासगी ऑपरेटरच्या माध्यमातून 2 नाेव्हेंबरपासून ही सेवा सुरू हाेण्याची शक्यता आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. कुंभमेळ्यात काेट्यवधी भाविक येणार आहेत. त्र्यंबकेश्वर येथील हेलिपॅडवर एकाचवेळी तीन हेलिकाॅप्टर हाताळण्याची क्षमता आहे. त्यामुळे प्रमुख शहरांमधून येणाऱ्या भाविकांना जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध हाेऊ शकते, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सरांगितले. त्यानुसार मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, सुरत आणि वलसाड येथील भाविकांसाठी ही सेवा उपयु्नत ठरणार आहे. प्रवास आणि दर्शनाचे नियाेजन याेग्यप्रकारे झाल्यास भाविकांना अवघ्या काही तासांत दर्शन घेऊन परतणे शक्य हाेईल. धार्मिक पर्यटनाबराेबरच नाशिक परिसरातील निसर्गरम्य ठिकाणांचे हवाई दर्शन घडवण्यासाठीही हेलिकाॅप्टरचा वापर करण्याची शक्यता आहे.