श्री दासबाेध नित्यपाठ

देवा मज काेणीच नाही। तुजवेगळे ।।1।।

    26-Oct-2026
Total Views |

RamdasSwami 
मुलांनी घरातून काढल्यामुळे छाेट्या खाेपटात ताे व त्याची पत्नी वेगळी राहू लागली. वृद्ध नवरा व तिसरेपणाची तरुण बायकाे एवढेच त्या खाेपटात गरिबीने पण प्रेमाने राहू लागले. त्या गरिबीतही त्याला समाधान वाटले. कारण पत्नी गुणवान असल्याने ती टुकीने संसार करीत हाेती. पण, दैवाला हेही पाहवले नाही. एके दिवशी परचक्र म्हणजे शत्रू सैन्याची धाड आली आणि त्यांनी गावात लुटालूट करताना याची चीजवस्तू आणि तरुण पत्नीही पळवून नेली. या आकस्मिक संकटामुळे ताे फार दु:खी हाेताे. ताेच त्या पत्नीला भ्रष्ट केल्याचीही बातमी आली आणि त्याच्या शाेकाला पारावर राहिला नाही.
 
ताे गडबडा लाेळून रडू भाकू लागला आणि आपल्या दु:खाची कर्मकथा येणाऱ्या जाणाऱ्यांना ऐकवू लागला. परदेशी कष्ट करून पैसे मिळवले, त्यातून लग्न केले, तर बायकाेलाच पळवून नेले. मुलांनी म्हातारपणी माझ्याकडे पाठ फिरविली आणि मी असा विकलांग झालाे. ‘पैसा नाही, पत्नी नाही, घर नाही, अंगी बळ नाही.