आयुष्यात एकदाही मानदुखी झाली नाही, असा माणूस सापडणं शक्य नाही. इतकी मानदुखी सार्वत्रिक आहे.या त्रासाचं सर्वांत महत्त्वाचं कारण शरीर घडतानाच तयार झालं आहे. ते म्हणजे मानेच्या मणक्याची रचना. शरीराच्या सर्व मणक्यांपैकी सर्वाधिक हालचाल मानेच्या मणक्यांमध्येच हाेते. जिथे हालचाल जास्त, तिथे घर्षण आणि घर्षणामुळे झीज जास्त, हे ठरलेलेच आहे. या झीजेमुळे मणक्यातील चकत्या सरकणं, मणक्याचे सांधे झिजणं या गाेष्टी मानेच्या मणक्यांना सर्वाधिक बाधित करतात.नैसर्गिक रचना, हेच या मानदुखीचं एकमेव कारण नाही. इतरही अनेक गाेष्टी त्यास हातभार लावत असतात.
गृहिणी, शेतमजूर, विद्यार्थी अशा नानाविध कार्यगटातील आणि वयाेगटातील व्यक्तींना मानदुखी असू शकते. वाकून काम करणं, वजन उचलणं, पाठीवर ओझं वाहणं, सलग अनेक तास चालणं, संगणकावर सलग काम करणं, इत्यादी गाेष्टी मानेचे मणके आणि स्नायूंवर ताण पाडतात. ही सर्व कामं दैनंदिन जीवनाचा आणि व्यवसायाचा भाग असल्यानं टाळणं अशक्य असतं. त्याची परिणती म्हणजे मानेच्या मणक्याची झीज लवकर सुरू हाेते.
व्यायामाकडे दुर्लक्ष, स्थूलतेमुळे स्नायूंमध्ये वाढणारं मेदाचं प्रमाण हा मानदुखीला हातभार लावणारा सर्वांत माेठा घटक. मान दुखणं म्हणजे, जे काम तुम्ही करत आहात, ते सहन करण्याची क्षमता मानेच्या स्नायूंमध्ये नाही, असं सांगण्याचा प्रयत्न शरीर करत असतं. त्यामुळे जाेपर्यंत स्नायू बळकट हाेत नाहीत, ताेपर्यंत काेणतीही गाेळी किंवा मलम हा मानदुखीवरील अंतिम उपाय असू शकत नाही.
खाण्याच्या सवयी, वातानूकुलीत जीवनशैली यामुळे अनेक व्यक्तींमध्ये मबी12फ आणि मडफ जीवनसत्वाचा अभाव असताे. ही जीवनसत्वं हाडांची मजबूती, नसांची कार्यक्षमता आणि स्नायूंची ताकद या तिन्ही महत्त्वाच्या गाेष्टींसाठी आवश्यक असतात. शाकाहारी जेवणामुळे बी12 ची कमतरता, ड जीवनसत्वाच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारं काेवळं ऊन न मिळाल्यामुळे मानदुखीला हातभार लागताे.
भारतीय रस्त्यांबद्दल फार काही न बाेलणंच बरं. खाचखळग्यांतून दुचाकीवरून केलेला प्रवास म्हणजे मानदुखीला आमंत्रण. दुचाकीवरून दरराेज खूप अंतर कापणं, दुचाकी चालवताना सदैव हादरे बसणं, दूर अंतर कापताना मधे विश्रांती न घेणं, या गाेष्टी मानेच्या मणक्यासाठी धाेकादायक असतात.दैनंदिन जीवनातील काही गाेष्टी टाळता येण्याजाेग्या नसतात. दिवसभर झाेपून राहता येत नाही. काही साध्या गाेष्टींची काळजी घेऊन मानदुखी टाळता येऊ शकते.