सालाबादप्रमाणे दुर्ग सिंहगड येथे दसरा सिमाेल्लंघन (विजयादशमी) साजर

    26-Oct-2026
Total Views |
 
Amruteshwar
19 ऑक्टाेबर राेजी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गाेजमगुंडे यांच्या उपस्थितीत अमृतेश्वर भैरव मंदिर येथे रात्री देवीचा जागर आणि गाेंधळ करण्यात आला.
 
जय मल्हार भजनी मंडळ आणि गाेंधळ राेहित अशाेक साेनवणे पार्टी, पुणे यांच्याकडून रात्रभर देवीचा जागर आणि गाेंधळ करण्यात आला. 20 ऑक्टाेबरला सकाळी 8 वा. महाआरती करण्यात आली. साेबत गडावरील एतिहासिक मंदिर आणि समाधीचे पूजन करण्यात आले.
 
सुभेदार सरदार पिलाजी जाधवराव यांचे वंशज समीर (दादा) जाधवराव श्रीमंत माने सरकार घराण्यातील रावसाहेब माने सरकार, निखिल बाळासाहेब माने सरकार, डाॅ. नंदकिशाेर मते, सिंहगड इतिहास अभ्यासक वैशाली हाडवळे, भांबुर्डा वन विभाग अधिकारी राजेंद्र कापसे, दत्ताजी जाेरकर, प्रकाश केदारी, सिंहगड परिवार यांच्याकडून गडपूजन करून ब्रह्मास्त्र प्रतिष्ठान ढाेलताशा पथक, धायरी पुणे यांच्याकडून संभळ ढाेलताशाच्या गजरात भंडारा उधळून इतिहास जिवंत ठेवण्याचे आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. गिरीश झगडे, राकेश गायकवाड, राकेश पवार, शिवशंकर जाधव, विशाल बेलसरे, पांडुरंग महाडिक, विशाल गायकवाड, पिंपरी चिंचवड, पुणे येथून सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी आणि गडप्रेमी आणि शिवप्रेमी उपस्थिती दर्शवली.