संध्यानंद.काॅम
युवांना मिळणारा पगार पाचव्या तारखेपर्यंत क्रेडिट कार्ड बिले, वैयक्तिक कर्ज, गॅझेटच्या हप्त्यांमध्ये विभागला जाताे. पुढचे 25 दिवस खर्च करण्यासाठी ते पुन्हा त्याच क्रेडिट कार्डवर अवलंबून राहू लागतात. हे एक दुष्टचक्र आहे. ज्यातून बाहेर पडणे दिवसेंदिवस अधिकाधिक कठीण हाेत चालले आहे.
युवांनी कर्जाच्या अदृश्य पिंजऱ्यातून मु्नत व्हावे
तरुण पिढीने हे कटू वास्तव स्वीकारले पाहिजे की, त्यांचे संपूर्ण आयुष्य भाैतिक झगमगाटाच्या मागे धावण्यात, मासिक हप्ते भरण्यात वाया जात आहे. कर्जाच्या या अदृश्य पिंजऱ्यातून स्वतःला मु्नत करणे आणि आपल्या आर्थिक बाबींचे सुज्ञपणे नियाेजन करणे, हाच आजच्या तरुणांसाठी आत्मनिर्भर हाेण्याचा एकमेव खरा मार्ग आहे.
मानसिक, आर्थिक तणावाने वेढलेले युवा
जागतिक, औद्याेगिक युगात युवा प्रतिभावान, सक्षम, साधनसंपन्न दिसतात. पण, आतून मानसिक, आर्थिक तणावाने वेढलेले आहेत. गेल्या काही दशकांच्या तुलनेत, युवांची शिकण्याची, नवीन निर्माण करण्याची, तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची क्षमता आश्चर्यकारक आहे; पण त्यामागे सर्व काही लवकर मिळवण्याची आंधळी शर्यत आहे. ही एक अत्यंत धाेकादायक प्रवृत्ती विकसित हाेत आहे. या आंधळ्या स्पर्धेमुळे आजची तरुण पिढी बाजारवादाच्या विळख्यात अडकत आहे, जिथे त्यांचे व्यक्तिमत्त्व केवळ एक ग्राहक बनले आहे. त्यांचे जीवन मासिक हप्त्यांच्या जाळ्यात कैद झाले आहे.
‘आता खरेदी करा, नंतर पैसे द्या’
माॅडेलची भुरळ युवांमध्ये गरजा व इच्छा यातील फरक ओळखण्याची क्षमता जवळजवळ संपली आहे. आपण काय, का खरेदी करताेय, त्याचा खरा उपयाेग आहे की नाही, हे प्रश्न आता दुय्यम झाले आहेत. समाजात, मित्रांमध्ये, इंटरनेटवर माेठे, यशस्वी दिसण्याच्या इच्छेपाेटी, तरुण अशा वस्तूंवर लाखाे रुपये खर्च करतात, ज्यांची त्यांना कदाचित कधीच गरज भासणार नाही.
क्रेडिट कार्ड्स आणि ‘आता खरेदी करा, नंतर पैसे द्या’सारख्या माॅडेल रचनांनी दिखाऊपणाच्या संस्कृतीला खतपाणी घातले आणि तरुणांना मंद विषाप्रमाणे कर्जाच्या दलदलीत ढकलले.
प्लास्टिक कार्ड, स्कॅनरमुळे पैसे खर्चल्याची जाणीव हाेत नाही
क्रेडिट कार्ड्स केवळ एक आर्थिक साधन न राहता, प्रतिष्ठेचे प्रतीक बनले आहे. चार-पाच प्रीमियम क्रेडिट कार्ड्स बाळगणे युवांसाठी अभिमानाची गाेष्ट आहे. राेखीने खरेदी केल्यावर हातातून पैसे जात असल्याची खरी भावना येते. पण, प्लास्टिक कार्ड, स्कॅनरमुळे पैसे खर्च झाल्याची जाणीव हाेत नाही. या मानसिक परिणामामुळे कर्जाचा बाेजा नकळतपणे वाढत जाताे.
आर्थिक साक्षरतेचा अभाव
भारतात क्रेडिट कार्डचा वापर खूप वेगाने वाढत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय क्रेडिट कार्डांची संख्या 10 काेटींच्या पुढे गेली आहे, जी देशाच्या लाेकसंख्येच्या सुमारे 5.5 ते 7 टक्के आहे. जागतिक स्तरावर, कॅनडामधील सुमारे 83 टक्के, अमेरिकेतील सुमारे 67 टक्के लाेक क्रेडिट कार्ड वापरतात. विकसित देशांमध्ये क्रेडिट कार्ड ही एक सामान्य गरज आहे. पण, भारतात आर्थिक साक्षरतेच्या अभावामुळे कार्ड वापरात वाढ झाली. ही अर्थव्यवस्था आणि वैयक्तिक आर्थिक आराेग्य या दाेन्हीसाठी चिंतेची बाब आहे.
आर्थिक स्थिरतेसाठी 50-30-20 चा सुवर्ण नियम
जीवनात आर्थिक स्थिरतेसाठी काही नियम बनवणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञ सांगतात. त्यापैकी, 50-30-20 चा नियम महत्त्वाचा आहे.
यामध्ये एकूण मासिक उत्पन्नापैकी 50 टक्के रक्कम अन्न, निवारा, शिक्षण आदी मूलभूत गरजांसाठी राखून ठेवा. त्यानंतर वैयक्तिक छंद, मनाेरंजनावर 30 टक्के रक्कम खर्च करा.
उर्वरित किमान 20 टक्के रक्कम काेणत्याही परिस्थितीत भविष्यासाठी बचत आणि गुंतवणुकीत, जसे की म्युच्युअल फंड, पीपीएफ, आपत्कालीन निधी गुंतवली पाहिजे. मासिक पगार लाखाे रुपयांमध्ये असला, तरी जर मासिक बचत शून्य असेल, तर ती व्यक्ती आर्थिकदृष्ट्या गरीबच राहते.