मुंबईतून काश्मीरच्या सीमा भागांत रेल्वेप्रवास शक्य

नायब राज्यपालांची माहिती : पर्यटन, उद्योग, रोजगाराला चालना

    24-Oct-2026
Total Views |

Chenab 
मुंबई, 23 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
मुंबईतून आता थेट देशाच्या सीमावर्ती भागापर्यंत रेल्वे नेता येणार असून, जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या पाच वर्षांत सुमारे दीड लाख काेटींचे प्रकल्प पूर्ण झाल्याची माहिती जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनाेज सिन्हा यांनी दिली. श्रीनगरमधील लाेकभवनात मुंबईतील माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना सिन्हा यांनी तेथील विकासकामांची माहिती दिली.
 
दुर्गम व सीमावर्ती भागांपर्यंत रेल्वेचे जाळे विस्तारण्यावर भर दिला जाणार असून, गुंतवणुकीमुळे पर्यटन, उद्याेग व स्थानिक राेजगाराला चालना मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
गेल्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या सव्वा काेटींवरून अडीच काेटींवर गेली आहे. वाढलेली विमानसेवा व रस्ते संपर्कामुळे प्रवास करणे साेपे झाले आहे. काश्मीर खाेऱ्यात पाच हजारांहून अधिक नवीन हाॅटेल्स सुरू झाल्याने स्थानिकांना राेजगाराच्या संधी मिळाल्याचे सिन्हा यांनी सांगितले. दुर्गम भाैगाेलिक परिस्थितीत उभारण्यात आलेला चिनाब नदीवरील जगातील सर्वाधिक उंच पूल भारतीय अभियांत्रिकीचे सामर्थ्य दाखवताे.
 
रेल्वे संपर्कामुळे जम्मू-काश्मीरमधील दळणवळण अधिक सक्षम हाेण्याची अपेक्षा आहे. जम्मू- रियासी ते पूंच या सुमारे 190 कि.मी.च्या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे सर्व्हेक्षण रेल्वे मंत्रालयाकडून सुरू आहे. या मार्गाच्या पुढील नियाेजनासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया हाती घेतली जाणार असल्याचे सिन्हा यांनी सांगितले.
 
काश्मीरमधील सफरचंद आणि अन्य फळे मुंबईच्या बाजारपेठेत जलद पाेहाेचवण्यासाठी रेल्वे वाहतुकीचा पर्याय महत्त्वाचा ठरत आहे. उधमपूर- श्रीनगर- बारामुल्ला रेल्वे मार्गामुळे काश्मीरमधील मालवाहतुकीला नवी दिशा मिळाली आहे. कटराहून 24 टन चेरी घेऊन निघालेली पार्सल व्हॅन सुमारे 30 तासांत वांद्रे येथे पाेहाेचली. काश्मीर ते दिल्लीपर्यंत रस्तेमार्गे माल पाेहाेचण्यासाठी 48 तास लागत हाेते. रेल्वेमुळे प्रवास 23 तासांत पूर्ण हाेत आहे. तसेच, वाहतूक खर्चात 60 टक्के बचत हाेत असून, फळे खराब हाेण्याचे प्रमाणही 50 ट्न्नयांनी कमी झाल्याचे सिन्हा यांनी सांगितले.