कोकण द्रुतगती मार्गाचा प्रकल्प आराखडा तीन महिन्यांत

एमएसआरडीसीची तयारी सुरू : शक्तीपीठ महामार्गाशी जोडणी करण्याचे नियोजन

    24-Oct-2026
Total Views |
 
konkanRailway
मुंबई, 23 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
मुंबई ते गाेव्यादरम्यानचा प्रवास जलद करण्यासाठी आणि काेकणातील वाहतुकीच्या वेळेत बचत करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या प्रस्तावित काेकण द्रुतगती महामार्गाच्या कामाला आता गती मिळणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) पुढील तीन महिन्यांत तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानंतर ताे राज्य सरकारच्या मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे.
 
मुंबई-गाेवा महामार्गाचे काम दीर्घकाळ रखडल्याने काेकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांना अपेक्षित वेगवान प्रवासाचा अनुभव मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र द्रुतगती महामार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. राज्य सरकारने 2020 मध्ये या प्रकल्पाची घाेषणा केली हाेती.
 
मात्र, या प्रकल्पाचे काम फारसे पुढे गेले नाही. सध्या हा प्रकल्प नियाेजनाच्या स्तरावरच असून, त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल एमएसआरडीसी तयार करत आहे. या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तीन महिन्यांत पूर्ण करून सरकारकडे पाठवण्याचे नियाेजन असल्याचे एमएसआरडीसीने नमूद केले.
 
काेकण द्रुतगती महामार्गाची श्नतीपीठ महामार्गाशी जाेडणी केली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा मार्ग श्नतीपीठ महामार्गाशी जाेडण्याचे नियाेजन आहे; तसेच विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेशीही याची जाेडणी करण्याचा विचार आहे. मात्र, या दाेन्ही मार्गांना जाेडणारी ठिकाणे अद्याप अंतिम झाली नसून, डीपीआर अंतिम झाल्यावरच त्याबाबत स्पष्टता येणार आहे.