हाय बीपी ही समस्या सामान्यपणे वय जास्त झालेल्या लाेकांचा आजार मानला जात हाेता. पण अलिकडे हाय बीपीची समस्या तरुणांनाही छळू लागली आहे. हे कमीच म्हणून आता 7-8 वर्षाच्या मुलांनाही हाेताेय हायबीपीचा त्रास. आहे. अलिकडेच करण्यात आलेल्या एका संशाेधनात आढळून आलं आहे की, वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी ब्लड प्रेशर वाढल्यास पुढील आयुष्यात म्हणजे साधारण पन्नाशीत प्रवेश करण्याआधीच, हृदयविकारामुळे मृत्यूचा धाेका अधिक वाढताे. अमेरिकन हार्ट असाेसिएशनच्या हायपरटेन्शन सायंटिफिक सेशन्स 2025 मध्ये हे संशाेधन सादर करण्यात आलं असून हे संशाेधन गच जर्नलमध्येही प्रकाशित झाले आहे.
या संशाेधनात प्रथमच लहान वयात (7 वर्षांच्या मुलांमध्ये) ब्लड प्रेशरचा परिणाम तपासण्यात आला. याआधीच्या अभ्यासांमध्ये 12 वर्षे वयाच्या मुलांमध्ये आढळणारा हाय बीपी पुढे जाऊन हृदयविकारामुळे मृत्यूचा धाेका वाढवताे, असं आढळून आलं हाेतं. मात्र, आता या नव्या निष्कर्षांनुसार हा धाेका त्याहीपेक्षा लवकर म्हणजेच सातव्या वर्षापासूनच सुरू हाेताे. संशाेधकांच्या मते, भारतासाठी ही बाब अधिक चिंतेची आहे. कारण, येथील अभ्यासांनुसार मुलांमध्रये हाय ब्लड प्रेशरचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
2021 मध्ये केलेल्या 64 अभ्यासात असे आढळले की, सुमारे 7% भारतीय मुले व किशाेरवयीन मुलांना हाय बीपीचा त्रास आहे. 2005 नंतर हे प्रमाण अधिक वेगानं वाढलं आहे. खासकरून शहरी भागांमध्ये हा धाेका जास्त असल्याचं आढळून आलं. त्यातही जाड मुलांमध्ये हा धाेका अधिक आहे. सामान्य वजनाच्या मुलांमध्ये 7% असलेला धाेका, जाड मुलांमध्ये ताे 29% इतका आढळला.