मुंबई, 16 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
माणसाला घडवण्याचे काम ग्रंथ करतात आणि ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पाेहाेचवण्यासाठी ग्रंथालये टिकवून ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे उपसभापती अहिर यांनी केले. मराठी भाषा विभागाच्या भाषा संचालनालयातर्फे वाचन प्रेरणा दिनानिमित्त शासकीय विधी महाविद्यालयात आयाेजित विशेष कार्यक्रमात अहिर बाेलत हाेते.
अहिर यांच्या हस्ते अर्थशास्त्र परिभाषा काेषचे प्रकाशन करण्यात आले; तसेच वाचन संस्कृती जाेपासणाऱ्या आणि समृद्ध करणाऱ्या वाचक प्रेरकांचा सत्कारही त्यांच्या हस्ते करण्यात आला. मराठी भाषेचा वारसा जपत तिला ज्ञानभाषा म्हणून विकसित करण्यासाठी अशाप्रकारचे उपक्रम काैतुकास्पद असल्याचे अहिर यांनी सांगितले.