मुंबई, 16 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
गुहागर तालुक्यातील पालशेत येथे शासकीय भूखंडावर चित्रपट आणि पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी फिल्म टुरिझम प्रकल्प उभारण्याबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) संयुक्त भागीदारीत सविस्तर प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी दिले. या प्रकल्पासाठी चित्रपट पर्यटन याेजनेंतर्गत निधी उपलब्ध करून घेण्यासाठी म्हाडाची मदत घेण्याबाबतही विचार करावा.