नवी दिल्लीतील राष्ट्रीय ऊर्जा परिषदेत महावितरणचा ७ राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरव

    17-Oct-2026
Total Views |
 
Mahavitaran
नवी दिल्ली, 16 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, हरित ऊर्जेला दिलेले प्राधान्य आणि वाढत्या विजेच्या मागणीसह भविष्यातील आव्हानांना सामाेरे जाण्यासाठी केलेल्या धाेरणात्मक बदलांमुळे महावितरणला देशातील भविष्यवेधी डिस्काॅम या मुख्य श्रेणीत राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला. यासह 7 पुरस्कार पटकावत महावितरणने दिल्लीतील 20व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेत उत्कृष्ट कामगिरीची माेहाेर उमटवली. महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर यांनी हे सर्व पुरस्कार स्वीकारले. इंडियन चेंबर ऑफ काॅमर्सने 20व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेचे 13 व 14 ऑक्टाेबरला आयाेजन केले हाेते. या परिषदेत महावितरणने हरित ऊर्जा व कामगिरीत सुधारणा या श्रेणीत प्रथम स्थान पटकावले. सेवांची गुणवत्ता व ग्राहक सक्षमीकरणमध्ये द्वितीय, तर कार्यक्षम कामकाज आणि तंत्रज्ञानाचा अवलंब या श्रेणींत देशात तिसरे स्थान मिळवले. या पुरस्कारांसह प्रभावशाली नवकल्पनेसाठी महावितरणचा सेवानिवृत्त केंद्रीय ऊर्जा सचिव अनिल राजदान यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.