आयुर्मान वाढविण्यात व्यायामामध्ये उत्तम आहे 'धावणे'

    17-Oct-2026
Total Views |

Run 
धावपटू असतात दीर्घायुषी :
रविवार जरी आपला सुटीचा वार असला तरी एक तास पळण्यासाठी आपल्याला आपली जुनी सवय माेडावी लागेल. जर आपण काेणताही व्यायाम न करता फक्त धावाल तर यामुळे आपले आराेग्य सुधारू शकते. अध्ययनातून आढळून आले आहे की, न धावणाऱ्यांच्या तुलनेत धावणारे सुमारे तीन वर्षे जास्त जगतात.
 
धावणे इतर सर्व व्यायामांपेक्षा उत्तम : संशाेधकांनी इतर व्यायामांशी याची तुलना केली असता त्यांना आढळले की, काेणत्याही इतर व्यायामाचा धावण्याइतका जास्त प्रभाव जीवनावर हाेताना दिसत नाही. संशाेधकांचे प्रमुख डाॅ. ली यांनी वेगवेगळ्या व्यक्तींवर संशाेधन केले. त्यामध्ये त्यांना आढळून आले की, धावणे (भले वेग कितीही असाे) एखाद्या व्यक्तीचा उच्च रक्तदाब वा स्थूलतेसारख्या आराेग्य समस्यांच्या इतिहास असूनही अकाली मृत्यूचा धाेका सुमारे 40 टक्के कमी करीत असताे. डाॅ. ली म्हणतात की, ‘नियमितपणे एक तास चालणे/ पळणे जीवन सात तासांपर्यंत वाढवते. कारण धावणे अकाली मृत्यूची उच्च रक्तदाब, शरीरात अवाजवी चरबीसारख्या सामान्य कारणां विराेधात लढाई करीत असते. ज्यामुळे आपण गुड फील करीत असता.
 
मूडही उत्तम राहताे :
धावण्यामुळे शरीरात ऊर्जे ची पातळी वाढते आणि मूडही उत्तम हाेताे. यामुळे शरीरात रक्तप्रवाह वेगवान हाेत असताे. कॅलरीही कमी हाेतात. ज्यामुळे कार्डियाेव्हेस्कुलर आराेग्य उत्तम हाेत असते व तणावही कमी हाेत असताे. जर धावण्याचे एवढे सारे फायदे असतील तर ते आपल्या सवयीत सामील करायला वेळ कशाला लावायचा.