अति खाण्यामळे प्राणी-पक्ष्यांनाही लगपणाचा विळखा !

    16-Oct-2026
Total Views |
 
PraniPakshi
संध्यानंद.काॅम
लठ्ठपणा ही आता केवळ माणसांची समस्या राहिलेली नाही. कुत्रे, मांजरींसह पाळीव प्राणी आणि पक्ष्यांमध्येही लठ्ठपणाचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे. मालकांचे अतिप्रेम, गरजेपेक्षा जास्त खाऊ आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे पाळीव प्राण्यांचे आराेग्य धाेक्यात येत आहे. अमेरिकेतील ‘असाेसिएशन फाॅर पेट ओबेसिटी प्रिव्हेन्शन’च्या अहवालानुसार, तेथील 59 टक्के कुत्रे आणि 61 टक्के मांजरी अतिरिक्त वजनाच्या समस्येने ग्रस्त आहेत. लंडनच्या राॅयल व्हेटरनरी काॅलेजच्या तज्ज्ञांच्या मते, जगभरातील पाळीव प्राण्यांमध्येही ही समस्या माेठ्या प्रमाणावर आढळते.
 
अतिलाड ठरताेय आराेग्यासाठी घातक जंगलातील प्राण्यांना अन्नासाठी भटकंती आणि शारीरिक श्रम करावे लागतात. मात्र, पाळीव प्राण्यांना सहज अन्न उपलब्ध हाेते. त्यातच मर्यादित हालचालींमुळे शरीरात चरबी साचते. विशेष म्हणजे, अनेक मालकांना आपला पाळीव प्राणी लठ्ठ झाल्याचेही जाणवत नाही.
 
प्राण्यांचे वजन आणि शारीरिक स्थिती तपासण्यासाठी ‘बाॅडी कंडिशन स्काेअर’ ही पद्धत वापरली जाते. दिल्लीत लठ्ठ कुत्र्यांची अनाेखी स्पर्धा या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी दिल्लीत ‘फॅटेस्ट डाॅग ऑफ दिल्ली’ ही आगळीवेगळी ऑनलाइन स्पर्धा आयाेजित करण्यात आली आहे. इन्स्टाग्रामवर कुत्र्यांची छायाचित्रे प्रसिद्ध करून मतदान घेतले जात आहे. दिल्ली विद्यापीठातील पत्रकारितेच्या एका विद्यार्थ्याने सुरू केलेल्या या उपक्रमाला माेठा प्रतिसाद मिळत आहे. हिराे, गाेगाे, तारा, चंकी आणि गाेला यांसारखे कुत्रे स्पर्धेत चर्चेत आहेत.
 
प्रेमाबराेबर आराेग्याचीही काळजी हवी पाळीव प्राण्यांवरील प्रेम म्हणजे त्यांना सतत खाऊ घालणे नव्हे. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पशुवैद्यकीय तपासणीही तितकीच महत्त्वाची आहे. कारण अतिलाडातून वाढणारा लठ्ठपणा हा प्राण्यांसाठी प्रेमाचा नव्हे, तर आराेग्याच्या संकटाचा इशारा आहे!