लहानपणापासूनच विविध कडधान्य खायला मिळणे जास्त फायदेशीर

    16-Oct-2026
Total Views |
 
Millets
ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळे, काेदा, राजगिरा ही मिलेट्स आहेत. यांच्यामध्ये इतर धान्यांच्या तुलनेत पाैष्टिकता जास्त असते. त्यामुळे यांना सुपरफूड म्हणतात. ही डायबिटिक फ्रेंडली म्हणजेच कमी ग्लायसेमिक इंडे्नसची असतात. यात अनेक महत्त्वाचे पाैष्टिक घटक आढळतात. जे काेलेस्ट्राॅल लेव्ह वाढण्यापासून राेखतात. ब्लड प्रेशर, हृदयाशी संबंधित राेग व इतर गंभीर आजारांपासून वाचवतात. जर लहानपणापासूनच हे खात असाल तर वजन नियंत्रित राहील तसेच अनेक गंभीर आजारांपासूनही रक्षण हाेईल.
 
हे ग्लूटेन फ्री असतात. यांच्यामध्ये व्हिटॅमिन, एंझाइम व विरघळणारे फायबर असते. नाचणीत दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असते. बीटा-कॅराेटिन, नियासिन, व्हिटॅमिन बी-6, फाेलिक अ‍ॅसिड, पाेटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न भरपूर असते. ज्वारीत भरपूर प्रमाणात अँटीऑ्नसीडेंट्स असतात, जे अँटीएजिंग एजंटचे काम करतात.
 
पचन व्यवस्थित राहते
पचनासाठी हे खूप चांगले मानले जातात. फायबर जास्त असल्यामुळे गॅस, अ‍ॅसिडिटी अशा समस्यांपासून सुटका मिळते. ग्लूटेन फ्री असल्यामुळे अ‍ॅलर्जीपासून रक्षण करते. हे अचानकपणे शरीरात शुगरची पातळी वाढवत नाहीत.
 
महिलांसाठी जास्त फायदेशीर का?
काही अध्ययनांनुसार यात असलेले मॅग्नेशियम पीरियड्सच्या वेळी हाेणाऱ्या क्रॅम्प्सपासून आराम देते. व्हिटॅमिन सी आणि ई भरपूर प्रमाणात आढळते. जे नॅचरल सनस्क्रीनचे काम करते आणि स्किन यूव्ही किरणांपासून वाचवते. गर्भवती महिलांमध्ये अ‍ॅनिमिया दूर करण्यात आयर्नने भरपूर बाजरी आणि रजाेनिवृत्तीनंतर बाेन मिनरल डेन्सिटी टिकवण्यात कॅल्शियमने भरपूर नाचणी खाणे आराेग्यासाठी फायदेशीर असते.
 
वजन नियंत्रित करण्यात मदत करते
मिलेट्समध्ये जास्त प्रमाणात फायबर आणि ट्रिप्टाेफॅन अ‍ॅमिनाे अ‍ॅसिड आढळते. जे संथपणे पचते. यामुळे पाेट दीर्घकाळ भरल्यासारखे जाणवते. यामुळे जास्त खाण्यापासून दूर राहिले जाते. वजन नियंत्रित राहते. लठ्ठपणा येऊ शकत नाही.