मुंबई, 15 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
राज्यातील आणखी चाळीस तालुके दुष्काळी म्हणून जाहीर करतानाच, या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना आगामी दिवाळीच्या ताेंडावर दिलासा म्हणून त्यांच्या खात्यावर पाच हजार रुपये अग्रीम जमा करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री माध्यमांशी बाेलत हाेते. शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीसाठी काेणत्याही प्रकारचा तगादा लावण्यात येऊ नये, अशी स्नतताकीद संबंधित साेसायट्यांपासून, जिल्हा बँका, राष्ट्रीयीकृत बँका आणि मायक्राे फायनान्स कंपन्यांना दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पाण्याच्या अवैध उपशावर कठाेर कारवाईचे निर्देश दिल्याचे आणि त्यासाठी साेळा हजार वीज जाेडण्या ताेडण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात यापूर्वीच 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यात आता आणखी 40 तालुक्यांचा समावेश करण्यात येत आहे. आता दुष्काळी तालुक्यांची संख्या 305 झाली आहे. या तालुक्यांत आता दुष्काळी उपाययाेजना करण्यास प्राधन्य देण्यात येणार आहे.
यापूर्वीच्या समाविष्ट तालुक्यांत दुष्काळाबाबत ट्रिगर एक लागू केला हाेता. आता नव्याने समाविष्ट तालुक्यांसह या तालुक्यांत ट्रिगर लागू करण्याबाबतच्या कार्यवाहीला गती देण्यात येत आहे. दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क काेणतेही निकष न लावता सरसकट माफ करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्यात शेतीसाठी साडेसात अश्वशक्तीपर्यंत वीजपुरवठा माेफतच आहे. यातूनही वीज बिलासाठी कुणी तगादा लावत असेल, तर त्यांना तसे न करण्याबात सक्त सूचना देण्यात येतील. कर्ज वसुलीसाठी मायक्राे फायनान्स कंपन्यांवरही लक्ष ठेवण्यात येत असून, त्यांनीही आततायीपणा करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.