श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती टस्टतर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्र

    16-Oct-2026
Total Views |
 
ShreemantDagdusehethGanpatiBappa
पुणे, 15 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत राज्याच्या विविध भागांतील 500 ज्येष्ठ नागरिकांना माेफत श्रवणयंत्र वाटप करण्यात आले. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी, काेषाध्यक्ष सुनील रासने, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, विश्वस्त राजेंद्र गावडे, विश्वस्त पराग वांबुरे, राजाभाऊ घाेडके, विलास रासकर, राजेंद्र पायमाेडे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते. अ‍ॅलिम्काे कंपनीच्या विद्यमाने या उपक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. ट्रस्टचे वैद्यकीय सेवा प्रमुख राजेंद्र परदेशी आणि सहकाऱ्यांनी उपक्रमाचे व्यवस्थापन केले.
 
ज्येष्ठ नागरिकांची पूर्व नाेंदणी झाल्यानंतर त्यांच्या कानाचे माप घेऊन त्यानुसार यंत्र दिले जाते. त्यामुळे भविष्यात रुग्णांना काेणत्याही प्रकारचा त्रास हाेत नाही. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यासारख्या भागातून, तसेच बीड, जालना, परभणी, नांदेड, यवतमाळ अशा विविध जिल्ह्यांतील लाभार्थ्यांचा यात सहभाग असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. आतापर्यंत 32 हजार नागरिकांना माेफत श्रवण यंत्राचे वाटप करण्यात आले आहे.