चाणक्यनीती

    16-Oct-2026
Total Views |

Chankya 
वाच्यार्थ :
पृथ्वीच्या उदरातील झरे, जलस्राेत, पवित्र अशी सुशील पतिव्रता स्री, लाेककल्याणकारी राजा, समाधानी ब्राह्मण (पुराेहित) इत्यादींना पवित्र मानले जाते.
भावार्थ :
पवित्र समजल्या जाणाऱ्या गाेष्टी काेणत्या, ते चाण्नय येथे सांगतात.
1. निर्झर ः
जमिनीखालील पाणी शुद्ध, पिण्यायाेग्य मानले जाते. कारण त्यात कुठलीही अशुद्धी मिसळलेली नसते. पुष्कळवेळा वाहत्या नदीकिनारी ओल्या वाळूत खाेदून असे पाझर शाेधून पिण्याचे (शुद्ध) पाणी भरले जाते. नदी, तलावादी जलाशयात अनेक जीवजंतू, घाण मिसळते. पशुपतीनाथसारख्या तीर्थक्षेत्री तर शवांचे विसर्जनही पाण्यात केले जाते.