जेन-झीसाठी पगारापेक्षा जास्त महत्त्व कामाच्या ठिकाणी लवचिक वातावरणाला

जेन-झींची कामाची व्याख्या बदलत आहे ?

    15-Oct-2026
Total Views |

GenZ 
संध्यानंद.काॅम
जेन-झी म्हणजे युवा पिढीचे काम, नाेकरीबाबत प्राधान्यक्रम मिलेनियल सारख्या जुन्या पिढ्यांपेक्षा वेगळे आहेत. हेच कारण आहे की, त्यांना नेहमी आळशी किंवा बेजबाबदार समजले जाते. मिलेनियल्स आणि बेबी बूमर्सची पिढी नाेकरीबाबत निष्ठा, जास्त कामाचे तास आणि व्य्नितगत त्याग यांना यशाचा आधार मानत आले आहेत.
 
या पिढ्या आणि जेन-झी यांच्यामध्ये ‘वर्क एथिक’ विषयी संघर्ष स्पष्ट दिसताे. एका सर्व्हेमध्ये जिथे 46% लाेकांनी बूमर्सना सर्वात जास्त कणखर वर्क एथिक असलेले मानले, तर 9% लाेकांनीच जेन-झीला या लायक मानले. काही काळापूर्वी एका सर्व्हेत 74% मॅनेजर्सनी सांगितले हाेते की, त्यांच्यासाठी जेन-झी बराेबर काम करणे कठीण आहे.
 
सत्य हे आहे की, जेन-झी कामाला आपल्या जीवनाचे एकमेव केंद्र मानण्याऐवजी त्याला जीवनाचा एक भाग मानते. ही पिढी चांगल्या पगाराबराेबर मानसिक आराेग्य, काम आणि वैय्नितक जीवन यामधील समताेल, व्य्नितगत सन्मान आणि कामात एक सार्थक उद्दिष्ट यांना सर्वात जास्त प्राथमिकता देते.
 
ही पिढी कामाला जीवनाचा एक हिस्सा मानते, पूर्ण जीवन नाही. एआय, डिजिटल देखरेख, अस्थिर राेजगार, वाढती कामगार कपात आणि महाग जीवनशैलीने या पिढीला असा विचार करण्यास भाग पाडले आहे की, नाेकरीसाठी पूर्ण जीवन पणाला लावता येणार नाही.
 
पारंपरिक कार्य संस्कृतीत बदल हवा जेन-झीला
केपीएमजीच्या अमेरिकेत झालेल्या एका सर्व्हेमध्ये 47% जेन-झीने सांगितले की, ते पारंपरिक 9 ते 5 जाॅब कल्चर बदलू इच्छितात. डेलाॅयच्या ग्लाेबल स्टडीमध्ये 46% जेन-झी कर्मचारी तणावापासून वाचण्यासाठी अशा कंपन्यांची निवड करू इच्छितात, ज्या मानसिक आराेग्य आणि लवचिक कामाचे वातावरण यांना प्राथमिकता देतील.
 
जेन-झी आळशी नाहीत, जाॅब बराेबर छंदही पूर्ण करतात
अमेरिकी लेबर ब्यूराेनुसार, 20 ते 24 वर्षांचे फुलटाइम कर्मचारी आठवड्यात सरासरी 40.5 तास काम करतात. 25 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या कामगारांमध्ये हा आकडा 41.9 तास हाेता. अनेक अभ्यासांनुसार जेन-झी युवा माेठ्या संख्येत छंद, फ्रीलांसिंग, कंटेंट क्रिएशन आणि अतिर्नित उत्पन्नाचे दुसरे स्राेत शाेधत आहेत.