नाशिक, 14 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांनी आपले पशुधन विकू नये. चाऱ्याची, पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात चारा डेपाेचेही नियाेजनही शासन करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गाेधनाचे संरक्षण करणे शेतीव्यवस्था टिकवण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
यंदाच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान-2 अभियानाचा प्रारंभ नाशिकमध्ये करण्यात आला. पाण्याचा प्रत्येक थेंब साठवणे, तलावांतील गाळ काढणे, बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि प्रत्येक जिल्ह्यात चारा डेपाेसह जलसंधारणाच्या कामांना प्राथमिकता देण्यात येईल; तसेच पिण्याच्या पाण्याला सर्वाे च्च प्राधान्य देऊन उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करत माणसे आणि जनावरांसाठी पाणी उपलब्धतेनंतरच रब्बी हंगामासाठी पाण्याचे नियाेजन करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळी परिस्थितीत काेणताही नागरिक उपाशी राहणार नाही, याची काळजी शासन घेईल. पात्र शिधापत्रिकाधारकांना आवश्यक अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासह शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय याेजनांचे लाभ पाेहाेचवण्यात येतील.
शेतकऱ्यांना मदत करणे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार देणे आणि संकटाच्या काळात नागरिकांच्या पाठीशी उभे राहणे ही शासनाची भूमिका आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील विजेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.