जय महाराष्ट्रमध्ये राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पटेल यांची मुलाखत

    15-Oct-2026
Total Views |

Krushi
मुंबई, 14 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
बदलते हवामान, पावसातील अनियमितता आणि शेतीसमाेरील विविध आव्हानांच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती पद्धती, पीक विविधीकरण आणि नैसर्गिक संसाधनांच्या कार्यक्षम वापरास महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
या अनुषंगाने बांबू लागवडीची क्षमता, त्याचे आर्थिक महत्त्व, मूल्यवर्धनाच्या संधी आणि पर्यावरण संवर्धनातील याेगदानाविषयी माहिती देणारी विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास आणि जय महाराष्ट्र कार्यक्रमांतून प्रसारित करण्यात येणार आहे. राज्य कृषी मूल्य आयाेगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कार्यदलाचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांच्याशी या मुलाखतींच्या माध्यमातून हा संवाद साधण्यात आला आहे.
 
दिलखुलास कार्यक्रमात ही मुलाखत गुरुवारी (15), शुक्रवारी (16) आणि शनिवारी (17 ऑक्टाेबर) सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच न्यूज ऑन एआयआर अ‍ॅपवर प्रसारित हाेणार आहे.