प्रेग्नन्सीतील धूम्रपान बाळासाठी हानिकारक

    14-Oct-2026
Total Views |
 
Smoke
नुकत्याच झालेल्या संशाेधनात धूम्रपानामुळे हाेणाऱ्या एका माेठ्या नुकसानीचा खुलासा झाला आहे. ज्या महिला प्रेग्नसीत स्माेकिंग करतात, त्यांच्या बाळाची हाडे ठिसूळ हाेतात व ती तुटण्याची भीती जास्त राहते. हे संशाेधन स्वीडनच्या ओरेब्राे विद्यापीठात करण्यात आले.
 
सल्ला :
रात्री बिछाना भिजवल्याबद्दल मुलांना रागावू नये पाच वर्षांपर्यंतची ही सामान्य प्रक्रिया पाच वर्षांच्या वयापर्यंत मूल रात्री झाेपेत बिछाना ओला करीत असेल तर त्याबद्दल त्याच्यावर चिडू नये. त्याबद्दल त्याला लाजवूही नये. या वयापर्यंत ही सामान्य प्रक्रिया असते.
 
पाच वर्षांनंतर 85 टक्के मुले ते कंट्राेल करायला शिकतात. पंधरा टक्के मुले हळूहळू कंट्राेल करायला शिकतात. एक टक्का मुले एडाेलसेंट एजपर्यंत यूरीन पास करू शकतात. कित्येकदा ही प्रक्रिया मेंदूकडून नियंत्रित हाेत असते. एखादे मूल लवकर तर एखादे उशिरा यूरीन नियंत्रित करायला शिकते. यूरीन पास करताना जळजळ हाेण्याची वा बद्धकाेष्ठतेची तक्रार असते. अशावेळी त्वरित डाॅ्नटरांना दाखवून उपचार सुरू करवून घ्यावेत.
 
ट्रीटमेंट :
संध्याकाळनंतर मुलांना लिक्विड कमीत कमी द्यावे. झाेपण्याच्या त्वरित आधी दूध व पाणी पाजू नये.
यूरीन करवून नंतरच झाेपवावे.
 
अलार्म थेरपी :
काही मुले ठरलेल्या वेळी यूरीन पास करतात. यासाठी पालक अलार्मही लावू शकतात. अलार्म वाजताच मुलाला जागे करावे.