विद्युत रोषणाईने उजळले अंबाबाई मंदिर

नवरात्रात भाविकांची अलोट गर्दी : सीसीटीव्हींची करडी नजर

    14-Oct-2026
Total Views |

Mahalaxmi 
काेल्हापूर, 13 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
साडेतीन श्नितपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर नवरात्राेत्सवानिमित्त करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत राेषणाईने उजळून निघाले आहे.
 
नवरात्राेत्सवात देवीच्या दर्शनासाठी घटस्थापनेपासूनच भाविकांची अलाेट गर्दी हाेत असल्याचे दिसून येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरावर 116 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे.
 
घटस्थापनेदिवशी मंदिरात फुलांचीही आकर्षक सजावट करण्यात आली हाेती. पहाटेपासून मंदिरात धार्मिक विधींनी सुरुवात झाली. सकाळी ताेफेच्या सलामीत घटस्थापना झाली.
 
सायंकाळी मंदिराची शिखरे आणि दीपमाळा आकर्षक विद्युत राेषणाईने उजळून निघाल्याने मंदिराच्या साैंदर्यात आणखी भर पडली. मंदिराच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणारा नऊ खणांचा, तीन आसनी गरुड मंडप चाैथरा अडीच वर्षांच्या पुनर्बांधणीनंतर भाविकांच्या सेवेत दाखल झाला. गतवर्षी 16 लाख भाविकांनी दर्शन घेतले हाेते. यंदा भाविकांची संख्या 20 लाखांपर्यंत पाेहाेचण्याची शक्यता लक्षात घेऊन देवस्थान समितीने चाेख नियाेजन केले आहे. शेतकरी बाजार परिसरात दर्शनरांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
गर्दीच्या नियंत्रणासाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावले असून, रांगेत पिण्याचे पाणी आणि पंख्यांची साेय केली आहे. घटस्थापनेपासूनच दर्शनासाठी गर्दी हाेत आहे. संपूर्ण मंदिर परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून लक्ष ठेवले जात आहे.