देशातील ४३ टक्के कर्मचारी ट व्हीलरने कामावर जातात

केंद्र सरकारच्या सर्वेक्षणातून माहिती; सार्वजनिक वाहतूक वापर १० टक्केच

    14-Oct-2026
Total Views |
 
vahan
नवी दिल्ली, 13 ऑ्नटाेबर (वि.प्र.) :
देशातील बहुतांश नाेकरदार कामावर जाण्यासाठी दुचाकी किंवा पायी चालण्याला प्राधान्य देतात. तब्बल 42.6 टक्के कर्मचारी दुचाकीने, तर 28.3 टक्के कर्मचारी पायी कामावर जातात. विशेष म्हणजे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (चेडझख) सर्वेक्षणातून ही माहिती समाेर आली आहे.
 
जुलै 2025 ते जून 2026 या कालावधीत देशात प्रथमच करण्यात आलेल्या राष्ट्रीय घरगुती प्रवास सर्वेक्षणात 15 वर्षे आणि त्यापुढील वयाेगटातील कर्मचाऱ्यांच्या प्रवासाच्या सवयींचा अभ्यास करण्यात आला.

शहरातील कर्मचाऱ्यांचा प्रवासखर्च अधिक
सर्वेक्षणानुसार, कामाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी एका कर्मचाऱ्याला दरमहा सरासरी 785 रुपये खर्च करावे लागतात. शहरी भागातील कर्मचाऱ्यांचा मासिक प्रवासखर्च सरासरी 1,044 रुपये आहे, तर ग्रामीण भागात ताे 612 रुपये आहे. म्हणजेच शहरातील कर्मचाऱ्यांचा प्रवासखर्च ग्रामीण भागाच्या तुलनेत सुमारे 70 टक्के अधिक आहे.
 
पुरुषांचा प्रवासखर्च महिलांपेक्षा जास्त
कामावर जाण्यासाठी पुरुष कर्मचारी दरमहा सरासरी 835 रुपये खर्च करतात, तर महिला कर्मचाऱ्यांचा हा खर्च 533 रुपये आहे. कामासाठी दरराेज एक किलाेमीटरपेक्षा अधिक अंतर प्रवास करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण 61.9 टक्के आहे. महिलांमध्ये हे प्रमाण 41.9 टक्के असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले.
 
सार्वजनिक वाहतुकीचा वापर कमी
देशात दुचाकी हे कामावर जाण्याचे सर्वाधिक लाेकप्रिय साधन ठरले आहे. त्यानंतर पायी जाणाऱ्यांचा क्रमांक लागताे. मात्र, बस आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर तुलनेने अत्यंत कमी असल्याचे दिसून आले आहे. या सर्वेक्षणामुळे देशातील कर्मचाऱ्यांच्या प्रवासाच्या सवयी, त्यासाठी हाेणारा खर्च व शहरी-ग्रामीण भागातील तफावत स्पष्ट झाली आहे.