गांदवलेकर महाराज

गुरू आपल्याला अंतिम सुख दाखवितात

    14-Oct-2026
Total Views |
 
GondavlekarMaharaj
एक लहान मुलगा एका विहिरीजवळ उभा हाेता. त्याची एक वस्तू आत पडली हाेती. ‘ती काढण्याकरिता मी आत उडी मारताे’ असे ताे म्हणू लागला. त्यावर तिथे हाेता ताे एक मनुष्य म्हणाला, ‘तू असे करू नकाेस, आत पडून बुडून जाशील.’ तरी पण ताे ऐकेना.
 
एवढ्यात त्याचा बाप तिथे आला. त्यानेही मुलाला पुष्कळ सांगून पाहिले, पण ताे ऐकेना. मग त्या मुलाला बापाने धाक दाखवून आणि मार देऊन घरात नेले. आता, मुलाला मारले म्हणून तुम्ही बापाला दाेष द्याल का? ‘एकुलता एक मुलगा, नवस करून झालेला, त्याला जाऊ दिले असते तर काय झाले असते?’ असे म्हणाल का? नाही ना? तर मग गुरू तरी काय करीत असतात? आपण विषय मागत असताे आणि ते दिले तर आपण त्यात बुडून मरू हे त्याला माहीत असते, म्हणूनच ताे आपल्याला त्यातून वाचविण्यासाठी चार गाेष्टी सांगून राहताे.
 
आपण तेही न ऐकले तर ताे आपत्ति वगैरे आणून धाक दाखविताे, आपण त्याबद्दल रडत असलाे तरी ताे आपल्याला त्यातून वर ओढीतच असताे.
 
आपण तर चांगले शिकले-सवरलेले, त्या मुलाप्रमाणे अज्ञान नसून चांगले, वयस्कर, तरीसुद्धा आपल्याला विषयात उडी घ्यावीशी वाटते; गुरूने सांगितले ‘लग्न करू नकाेस’ त आपण ‘लग्न कधी हाेईल’ म्हणून त्याच्या पाठीस लागत असताे, आणि शेवटी तर ‘गुरूला समजतच नाही’ असे म्हणण्यापर्यंत आपली मजल जाते! आपण सध्या दिसणाऱ्या सुखापासून आपल्याला परावृत्त करीत असताे. तेव्हा आपण गुरूवचनावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे; आणि ताे जे साधन सांगेल तेच करीत राहावे, म्हणजे आपल्याला अंतिम सुखाचा लाभ हाेईल.गुरू आज्ञा करताे म्हणजे काय करताे? तर आपले मन जिथे गुंतले असेल तिथून त्याला काढण्याचा ताे प्रयत्न करताे.
 
भगवंत भक्ताची संकटे नाहीशी करताे म्हणजे त्याची प्रापंचिक संकटे दूर करताे असे नाही. ती काय, सहज दूर करता येतात; पण भक्ताला सम ाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती भगवंत देताे. भक्ताला ताे नेहमी स्मरणांत ठेवताे. असे भक्तच संतपदाला पाेचतात. एखाद्या विद्वान माणसाची विद्वत्ता ओळखायला आपण थाेडे तरी विद्वान् झाले पाहिजे, त्याचप्रमाणे संत ओळखायला संतांच्या ठिकाणी असणारा गुण थाेडा तरी आपल्या ठिकाणी असला पाहिजे.
 
संतांचा मुख्य गुण म्हणजे ते भक्तीला चिकटलेले असतात. सत्पुरुषांचे बाहेरून वागण्याचे प्रकार त्या त्या देशकालमानाने निरनिराळे असतात, पण आतले भगवंताचे प्रेम मात्र सर्वांचे एकच असले पाहिजे.