मुंबई, 12 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी तसेच जलसाठ्यांची क्षमता वाढवणे आणि शेतीची उत्पादकता सुधारण्याच्या दृष्टीने गाळमु्नत धरण, गाळयु्नत शिवार याेजनेच्या कामांना गती देण्यावर भर देण्यात येणार आहे.
या याेजनेत पुढील आठ महिने जाेमाने काम करण्याचे निर्दे श जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आणि मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांनी संबंधित विभागांच्या अधिकारी व स्वयंसेवी संस्थांना दिले.
गाळमु्नत धरण, गाळयु्नत शिवार याेजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी डवले यांच्या अध्यक्षतेखाली आणि पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. या बैठकीत या याेजनेत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना येणाऱ्या अडचणी, कामकाजातील विविध प्रश्न, तसेच याेजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक उपाययाेजना आणि संस्थांनी मांडलेल्या सूचनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील जलसाठ्यांमधील गाळ काढून त्याचा शेतजमिनींसाठी उपयाेग केल्यास धरणांची जलसाठवण क्षमता वाढण्यास मदत हाेण्यासह शेतजमिनींची सुपीकताही वाढू शकते. या दृष्टीने जलसंपदा आणि मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील धरणांमधून सुपीक गाळ काढून ताे शेतकऱ्यांच्या शेतात पसरवण्याच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जलसाठ्यांचे संवर्धन, पाण्याची उपलब्धता आणि शेतजमिनींची सुपीकता सुधारण्याच्या दृष्टीने गाळमु्नत धरण, गाळयु्नत शिवार याेजना महत्त्वपूर्ण ठरणार असून, आगामी आठ महिन्यांत या याेजनेतील कामांची गती वाढवण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.