एवं, कामावांचूनि कांहींŸ। जगा मूळचि आन नाहींŸ।
ऐसे बाेलती पाहींŸ। आसुर गा ते Ÿ।। (16.312)
आसुरी संपत्तीचेच वर्णन ज्ञानेश्वर पुन्हा विस्ताराने करीत आहेत. या प्रवृत्तीचे लाेक निवृत्ती जाणीत नाहीत. पावित्र्य, सदाचार, सत्य यापैकी काही त्यांना मान्य नसते.
काेशकीटक ज्याप्रमाणे घर बांधताना त्याला बाहेर येण्याचे दार ठेवीत नाही किंवा एखादा मूर्ख मनुष्य चाेराला भांडवल देताे, त्याप्रमाणे आसुरी माणसाला सारासार विचार नसताे.
एखाद्या वेळी काेळसा काळेपणा साेडेल, कावळा पांढरा हाेईल, राक्षसाला मांसाचा वीट येईल, पण आसुरी माणसाला शुचित्व येणार नाही. दारूच्या भांड्याला पवित्रता कशी मिळेल? वडिलांची वागणूक, धर्मशास्त्र इत्यादी ताे काहीच जाणीत नाही. शेळी वाटेल तसे चरते, वारा आणि अग्नी वाटेल तसा पसरताे, त्याप्रमाणे यांचे वागणे स्वच्छंदीपणाचे असते. विंचू आपल्या नांगीने गुदगुल्या करील का? त्याप्रमाणे हे लाेक स्वभावत:च वाईट असतात.धुराड्याच्या ताेंडातून जसे धुराचे लाेट निघतात, त्याप्रमाणे आसुरांचे बाेलणे असते. या जगाचे नियमन करणारा काेणी ईश्वर आहे हे त्यांना मान्य नसते. आपल्या सामर्थ्याने मिळेल ते भाेगावे, एवढेच पुण्य ते मानतात. पशू-पक्षी काेणत्या विधिविधानाने लग्न करतात ?
असा त्यांचा प्रश्न असताे. चाेरीचे द्रव्य ते बाळगतात. धर्माचरण करणारा देह मरून जाणार, मग भाेगायला काय उरते? या भाेगाच्या कामी इंद्र जसा उर्वशीच्या याेगाने सुखी आहे, तितकाच सुखी मनुष्य पृथ्वीवरील ऐहिक कर्मात आहे. स्वर्गनरक, पापपुण्य या ठिकाणी एका कामाचाच लाेभ आहे. म्हणून स्त्री व पुरुष जेथे कामाच्या याेगाने एकत्र येतात, तेथे सर्व जग उत्पन्न हाेते. याप्रमाणे एका कामाशिवाय या जगाला दुसरे काही मूळच नाही. असे हे आसुर नेहमी बाेलत असतात. आसुरांचे विस्ताराने वर्णन करून शेवटी ज्ञानेश्वरही थकून म्हणतात, ‘आता पुरे. वाचा निष्फळ हाेऊ नये.’