नागपूर, 13 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रवाशांची अतिर्नित गर्दी लक्षात घेऊन पुणे ते नागपूर, नाशिक ते नागपूर, मुंबई ते नागपूर, नागपूर ते अकाेला, नागपूर ते भुसावळ आणि साेलापूर ते नागपूर दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या धावणार आहेत.
रेल्वेच्या नियाेजनानुसार 01215 विशेष गाडी 19 आणि 21 ऑक्टाेबरला पुण्यातून 14.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 7.30 वाजता नागपूरला पाेहचेल. 01216 विशेष गाडी 20 आणि 22 ऑक्टाेबरला नागपूरहून रात्री 11 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 4.20 वाजता पुण्यास पाेहाेचेल. नाशिक राेडहून 01217 ही विशेष गाडी 18 आणि 20 ऑक्टाेबरला 18 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 5.00 वाजता नागपूरला पाेहाेचेल. 01218 विशेष गाडी 19 आणि 21 ऑक्टाेबरला नागपूरहून 22 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 10.20 वाजता नाशिक राेडला पाेहाेचेल.
मुंबईतून 01019 विशेष गाडी 19 आणि 21 ऑक्टाेबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून 14.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 6.10 वाजता नागपूरला पाेहाेचेल. 01020 विशेष गाडी 20 आणि 22 ऑक्टाेबरला नागपूरहून 22.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 17.20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पाेहाेचेल. 01218 विशेष गाडी दिनांक 18 ऑक्टाेबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून 14.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 6.10 वाजता नागपूरला पाेहाेचेल. 01220 विशेष गाडी 19 ऑक्टाेबरला नागपूरहून 22.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 17.20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पाेहाेचेल. नागपूरहून 01131 विशेष गाडी 20 आणि 21 ऑक्टाेबरला 18.40 वाजता सुटेल आणि अकाेल्यास त्याच दिवशी 23.30 वाजता पाेहाेचेल. 01132 विशेष गाडी 21 आणि 22 ऑक्टाेबरला अकाेल्याहून 00.20 वाजता सुटेल आणि नागपूरला त्याच दिवशी 4.50 वाजता पाेहाेचेल. 01213 ही विशेष गाडी 21 आणि 22 ऑक्टाेबरला भुसावळहून 5.00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 12.20 वाजता नागपूरला पाेहाेचेल. 01214 विशेष गाडी 20 आणि 21 ऑक्टाेबरला नागपूरहून 21.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 4.00 वाजता भुसावळला पाेहाेचेल. 01029 विशेष गाडी 19 राेजी साेलापूरहूम 9.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 5.10 वाजता नागपूरला पाेहाेचेल. 01030 विशेष गाडी 20 ऑक्टाेबरला नागपूरहून 23.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 23.45 वाजता साेलापूरला पाेहाेचेल.