मुंबई, 12 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
सेवा फर्स्ट इनाेव्हेशन चॅलेंज स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन काैशल्य, राेजगार, उद्याेजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लाेढा यांनी मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर कक्षात झालेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी रतन टाटा महाराष्ट्र राज्य काैशल्य विद्यापीठाच्या कुलगरू डाॅ. अपूर्वा पालकर, कुलसचिव डाॅ. वैभव नरवडे, सृजन ट्रस्टचे विश्वस्त दीपक मुकादम, डाॅ. अमित नेहते, विज्ञान भारती काेकण प्रांतच्या अनुपमा कुलकर्णी उपस्थित हाेते. सृजन ट्रस्ट, पुणे आणि विज्ञान भारती काेकण प्रांत या दाेन्ही संस्थांसह काैशल्य विकास विभागाने सामंजस्य करार केला.
केंद्रीय काैशल्य विभागामार्फत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सुरू असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत सेवा फर्स्ट इनाेव्हेशन चॅलेंज या बहुराज्यीय स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात काैशल्य विकास विभागाच्या मार्फत महाराष्ट्रात या स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे. 21 सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, 17 ऑक्टाेबरपर्यंत ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येईल. महाराष्ट्रातून 3878 स्पर्धकांनी आतापर्यंत अर्ज केला आहे. स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना काैशल्य विकास विभागामार्फत मार्गदर्शन केले जात असल्याचे लाेढा यांनी सांगितले.
या स्पर्धेत ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. हीींिीं://ीर्शींरळपर्पेींरींळेपलहरश्रश्रशपसश.ळप/ या लिंकच्या माध्यमातून अथवा क्यूआर काेड स्कॅन करून इच्छुक स्पर्धेसाठी आपला प्रकल्प सादर करू शकतात. या पाेर्टलवर पहिल्या स्तरावर प्राथमिक माहिती नाेंदणीसाठी आवश्यक असेल तसेच दुसऱ्या स्तरावर प्रकल्प सादर करताना आधार संलग्न वैय्नितक माहिती व प्रकल्पाची माहिती उमेदवारांना सादर करावी लागणार आहे. सर्व प्रक्रिया ऑनलाइन हाेणार असून, उमेदवारांच्या शंकेचे निरसन करण्यासाठी चॅट बाॅट सुविधाही संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे लाेढा यांनी सांगितले.