कुंभमेळ्यासाठी भाजीपाला उत्पादनाला केंद्र सरकारची मंजुरी

राज्याचा कृषी विभाग राबवणार ३०० कोटींची योजन

    13-Oct-2026
Total Views |
 
Nashik
नाशिक, 12 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
येथे पुढील वर्षी हाेणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिर्नित भाजीपाला उत्पादनासाठी नाशिकसह शेजारील जिल्ह्यांमध्ये हरितगृह, शेडनेटसारख्या संरक्षित शेतीला चालना देण्यासाठी 300 काेटींच्या याेजनेला केंद्राने प्राथमिक मंजुरी दिली.
 
नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा 31 ऑक्टाेबर ते 24 जुलै 2028 या काळात पार पडणार आहे. सुमारे 28 महिने चालणाऱ्या या कुंभमेळ्यात सुमारे 12 काेटी भाविक सहभागी हाेण्याची शक्यता आहे. या भाविकांसाठी अतिर्नित भाजीपाल्याची गरज आहे. ही अतिर्नित गरज भागवण्यासाठी नाशिकसह पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि धुळे जिल्ह्यात हरितगृह, शेडनेटसारख्या संरक्षित शेतीद्वारे अतिर्नित उत्पादन घेण्यात यावे जेणेकरून भाजीपाल्याची गरज स्थानिक पातळीवर भागेल. संरक्षित शेतीची पायाभूत सुविधा उभी राहील. स्थानिक पातळीवर राेजगारवृद्धी हाेईल. नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसान न हाेता दर्जेदार भाजीपाला ग्राहकांना मिळेल, या उद्देशाने कृषी विभागाने सुमारे 300 काेटींच्या संरक्षित शेती याेजनेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला हाेता.
 
राज्य सरकारच्या या संरक्षित शेती याेजनेच्या प्रस्तावाला केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चाैहान यांनी प्राथमिक मंजुरी दिली. प्रस्तावातील काही त्रुटी दूर करून संबंधित प्रस्ताव नव्याने सादर करण्याच्या सूचनाही केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिल्या. त्यानुसार सुधारित प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.
 
हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले आहे. ऊन, वादळी वारा, पाऊस, अतिवृष्टी, गारपिटीसारख्या आपत्तींमध्ये पिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि खात्रीशीर उत्पादनांसाठी संरक्षित शेती गरजेची आहे. कुंभमेळ्याच्या काळात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ हाेणार आहे. संभाव्य मागणी, स्थानिक शेतकऱ्यांचे हित आणि शेतीच्या पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी केंद्राने संरक्षित शेती याेजनेला प्राथमिक मंजुरी दिल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.