रवींद्र साठे यांच्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागाचे आज प्रसारण

    13-Oct-2026
Total Views |
 
GraminRojgar
मुंबई, 12 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
ग्रामीण भागातील कारागीर, महिला, युवक आणि नवउद्याेजकांना राेजगार व स्वयंराेजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासह स्थानिक उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्य खादी व ग्रामाेद्याेग मंडळामार्फत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. पारंपरिक काैशल्य, स्थानिक साधनसंपत्ती आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत असल्याचे मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी सांगितले.
 
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र कार्यक्रमात साठे यांच्या विशेष मुलाखतीच्या दुसऱ्या भागाचे प्रसारण मंगळवारी (13 ऑक्टाेबर) रात्री 8 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर हाेणार आहे. निवेदिका अवंती देसाई यांनी ही मुलाखत घेतली आहे. हा कार्यक्रम महासंचालनालयाच्या अधिकृत समाज माध्यमांवरही उपलब्ध हाेणार आहे.