मुंबई, 12 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
राज्यात उद्भवलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पुढील सहा ते आठ महिने अधिक आधार देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी राेजगारनिर्मिती, गरजूंपर्यंत अन्नधान्य पाेहाेचवणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पशुधनासाठी चारापाणी उपलब्ध करून देण्याचे सूक्ष्म नियाेजन करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासाेबतच्या बैठकीत दिली. केंद्रीय पथकाकडून दुष्काळी भागातील परिस्थितीबाबतचा अहवाल केंद्र सरकारला सादर हाेईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्य्नत केला.
केंद्रीय पथकाने विस्तृत दाैरा करून तळागाळापर्यंत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. त्यामुळे नागरिकांमध्ये आपल्या अडचणी समजून घेतल्याचे समाधान झाल्याचे केंद्रीय पथकाला सांगितले. या पथकाच्या संवेदनशील पाहणीमुळे दुष्काळाची तीव्रता केंद्र सरकारपर्यंत पाेहाेचण्यास मदत हाेईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या बैठकीस आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाचे प्रमुख तथा केंद्रीय संयु्नत सचिव मु्नतानंद अग्रवाल यांच्यासह केंद्रीय पथकातील सदस्य उपस्थित हाेते.
राज्याच्या वतीने मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव विनिता वेद सिंघल, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन नैनुटिया, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, राेजगार हमी याेजना विभागाचे सचिव अप्पासाे धुळाज, जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, पशुसंवर्धन आयु्नत डाॅ. किरण पाटील, प्रधान मुख्य वन संरक्षक एम. श्रीनिवास राव यांनी दुष्काळासंदर्भात सद्यस्थिती सांगून संबंधित विभागांच्या उपाययाेजनांबाबतची माहिती दिली. मु्नतानंद अग्रवाल यांच्यासह पथकातील सदस्यांनी राज्यातील पाहणीदरम्यान आढळून आलेल्या वस्तुस्थितीबाबत माहिती दिली.