गंभीर समस्या वाढण्यास साखर कारणीभूत

    13-Oct-2026
Total Views |
 
Sugar
साखर जास्त प्रमाणात खाणे हे शारीरिक गंभीर स्वास्थ्यरूपी समस्यांचे कारण बनू शकते. साखर जास्त खाल्ल्याने न केवळ वजन वाढण्यास कारणीभूत हाेते, तर हे शरीराच्या कित्येक अवयवांना आणि सिस्टिम्सवर नकारात्मक प्रभाव पाडते. साखरेचे अतिरिक्त सेवन शरीराला गंभीर अशी स्वास्थ्याची जाेखीम उत्पन्न करते.
 
लठ्ठपणा :
साखरेमध्ये जास्त कॅलरीज असतात. आणि याचे सेवन करण्याने शरीरात अतिरिक्त मांस जमा हाेऊ लागते, त्यामुळे लठ्ठपणा वाढताे. गाेड पेय पदार्थ, मिठाई व प्राेसेस्ड फूड यांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. जे वजन वाढवते. साखरेतून मिळणाऱ्या कॅलरींमध्ये काहीही पाेषक तत्वे नसतात. जे याला फक्त मरिक्त कॅलरीफ तयार करतात.
 
मधुमेह :
जास्त प्रमाणात साखरेचे सेवन हे शरीरातील इन्शूलिन तयार करण्याच्या प्रक्रियेला अवराेध करते. कारण त्यांत अतिरिक्त मांस जमल्याने लठ्ठपणा वाढताे. ज्यामुळे इन्शूलिन अवराेध वाढू शकताे. आणि वेळेवर उपचार मिळाले नाहीत, तर हे टाईप 2 मधुमेहाचे कारणं हाेऊ शकते. इन्शुलिन हार्माेन ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास जबाबदार असताे. आणि यांचे असंतुलन मधुमेह टाईप 2 चे कारण बनते,. साखरेचे वाढलेले प्रमाण रक्तशर्करेचा स्तर वाढवत नेते, आणि त्याद्वारे इन्शुलिन निर्माण हाेण्यास दबाव वाढू लागताे. तसेच हळू हळू याचा परिणाम कमी कमी हाेऊ लागताे.
 
हृदय राेग :
साखरेचे अतिरिक्त सेवन हे हृदय राेग हाेण्याचे प्रमुख कारण मानले जाते. हे ब्लडप्रेशर वाढवू शकते व खराब एलडीएल काेलॅस््रटाेलची लेवल वाढवू शकते, ज्यामुळे हृदयाच्या नसांमध्ये ब्लाॅकेज निर्मण करू शकते. साखर सूज वाढविण्याचे काम करते : जी शरीरात खूपसे आजार जसे कि अर्थ्रराइटिस व कॅन्सर चा धाेका वाढू शकताे. जास्त साखर खाण्याने सूज येणे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढताे. साखर खाण्याने रक्तशर्कराच्या लेवल मध्ये अचानकच वाढ वा कमी प्रमाण हाेणे हे हाेऊ शकते, ज्यामुळे उर्जेची लेव्हल अस्थिर हाेऊन थकवा जाणवू लागताे.
 
दातांच्या समस्या : साखर म्हणजे बॅक्टेरीयाचे जेवण .. जेव्हा आपण साखर खाताे, तेव्हा हि ताेन्डात असणाऱ्या बॅक्टेरियाशी प्रतिक्रिया करून ऍसिड निर्माण करते. जाे दातांच्या एनॅमल ला नुकसानकारक असून कॅव्हिटी तयार करण्यास कारणीभूत हाेत असते. संशाेधनात असे आढळले की जास्त साखर खाण्याने डिप्रेशन येणे व चिंता वाढविणे हे असते. साखरयुक्त पदार्थ नियमित खाण्याने मूड स्विन्ग्स समस्या निर्माण हाेऊ शकतात.
 
लिव्हरचे नुकसान :
साखरेमध्ये फ्रुक्टाेज नावाचा घटक पदार्थ असताे, ज्याला फक्त लिव्हर हेच मेटॅबाेलाईज करू शकते. जेव्हा जास्त प्रमाणात फ्रुकटाेज खाल्ले जाते, तेव्हा लिव्हर या अतिरिक्त साखरेला मांसामध्ये रूपांतरीत करते, ज्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या निर्माण हाेते. साखर जास्त खाल्ल्याने लिव्हर वर भार वाढताे, जे लिव्हर संबंधी समस्यांचे कारण हाेऊ शकते.
 
कॅन्सरचा धाेका :
जास्त साखर खाण्याने लठ्ठपणा, सूज येणे आणि इन्शुलिन अवराेधाशी जाेडला गेलेला आहे, व कॅन्सरचा धाेका वाढवू शकताे. विशेषतः ब्रेस्ट कॅन्सर.