गेल्या 40 वर्षांत चैनीच्या वस्तूंची व्याख्या बदलली

    13-Oct-2026
Total Views |
 
Chini
संध्यानंद.काॅम
एक काळ असा हाेता की, स्कूटर खरेदी करण्यासाठी अनेक वर्षे वाट पाहावी लागत असे. घरात टेलिफाेन, कलर टीव्ही, रेफ्रिजरेटर किंवा एअर कंडिशनर असणे हे श्रीमंतीचे लक्षण मानले जात असे.
 
हवाई प्रवास आणि परदेश प्रवास हे केवळ काही निवडक लाेकांपुरतेच मर्यादित हाेते. परंतु गेल्या तीन ते चार दशकांत भारताची अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि ग्राहक बाजारपेठेत झालेल्या बदलांमुळे हे चित्र पूर्णपणे पालटले आहे.
 
अनेक वस्तू निम्न मध्यमवर्गाच्याही आवाक्यात
आर्थिक सर्वेक्षण 2025-26 आणि घरगुती उपभाेग खर्च सर्वेक्षण (कउकएड) 2023-24 यांसारख्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशाेधन कंपन्यांच्या आकडेवारीनुसार, एकेकाळी चैनीच्या मानल्या जाणाऱ्या वस्तू आता मध्यमवर्गीयांसाठी आणि अनेक बाबतीत निम्न मध्यमवर्गासाठीही आवाक्यात आल्या आहेत.
 
वेळ, साेय बनले चैनीच्या वस्तू
आता, चैनीच्या नवीन व्याख्येत महागड्या वस्तूंपलीकडे जाऊन वेळ, साेय, वैयक्तिक अनुभव आणि आवडीनुसार बदल करण्याची साेय यांचा समावेश झाला आहे.
 
फाेन, फ्रीज, गाड्या बनले सामान्य
एकेकाळी प्रतिष्ठेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या फाेन, स्कूटर आणि रेफ्रिजरेटरसारख्या वस्तू आता सर्वसामान्य हाेत आहेत.
फाेन :
चार दशकांपूर्वी, घरात लँडलाइन फाेन असणे ही एक चैनीची गाेष्ट मानली जात हाेती. माेबाइल सेवा 1995 मध्ये सुरू झाली. त्या वेळी, खूप कमी माेबाइल फाेन उपलब्ध हाेते. हँडसेटची किंमत 25,000- 40,000 रुपये हाेती. अगदी येणाऱ्या काॅलसाठीही प्रतिमिनिट 7-8 रुपये लागत हाेते. आज, देशात 1.25 अब्जाहून अधिक माेबाइल कनेक्शन्स आहेत. 95% पेक्षा जास्त घरांमध्ये माेबाइल फाेन आहे.
 
रेफ्रिजरेटर :
ग्रामीण भारतात 2011-12 मध्ये, केवळ 9.4% लाेकांकडे रेफ्रिजरेटर हाेता. हा आकडा 2023-24 मध्ये, 33.2% पर्यंत घसरला. शहरी भागांमध्ये, हा आकडा 43.8% वरून 68.1% पर्यंत वाढला.
 
हवाई प्रवास :
1990 च्या दशकातील 1 काेटी देशांतर्गत हवाई प्रवासावरून, हा आकडा आता वार्षिक 16 काेटींहून अधिक झाला आहे.
 
कार आणि दुचाकी :
एकेकाळी कारला चैनीच्या वस्तू मानले जात असे. महिनाेन्महिने वाट पाहून आणि जास्तीचे पैसे देऊनही दुचाकी मिळवणे कठीण हाेते. 2011-12 मध्येही, भारतातील केवळ 19% कुटुंबांकडे कार हाेती. 2023- 24 मध्ये हा आकडा 59% पर्यंत वाढताे. शहरी भागांमध्ये, हा आकडा 40.1% कुटुंबांपासून 68.2% कुटुंबांपर्यंत वाढताे.