मुंबई, 11 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात वनसंवर्धन, वन्यजीव संरक्षण, मानववन्यजीव संघर्ष, जैवविविधतेचे जतन आणि वनपर्यटन या विषयावर काेल्हापूर प्रादेशिक वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांची मुलाखत प्रसारित हाेणार आहे.
ही मुलाखत साेमवारी (12), मंगळवारी (13) बुधवारी (14 ऑक्टाेबर) सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एआयआर अॅपवर प्रसारित हाेणार आहे. मुलाखत वृषाली पाटील यांनी घेतली आहे. या मुलाखतीत वन्यजीव सप्ताहानिमित्त आयाेजित उपक्रम, वृक्षलागवड व वनसंवर्धन, वन्यजीवांची शिकार राेखण्यासाठी करण्यात येणारी उपाययाेजना आणि वन्यजीव संरक्षणासाठी नागरिकांचा सहभाग या विषयांवर माहिती देण्यात आली आहे.