रामापायी ठेवावें मनŸ। त्यासी कर्तव्य नाहीं उरलें जाण।। देहभाेग आजवरी नाही सुटला काेणाला। त्याचा त्रास मात्र नाहीं रामभक्ताला।। तुम्हांला आतां करण्याचेच नाही कांहींŸ। भाव ठेवा रामापायींŸ।। नामांतच राहे समाधानŸ। ही सद्गुरूची आहे खूणŸ।। रामास जावें अनन्य शरण। कृपा करील ताे दयाघन।। देह साेडावा प्रारब्धावर। ज्या ज्या वेळी जें जें हाेईल ताे मानावा आनंद।। दृश्यातें नाही मानूं सत्य। रामरूपीं ठेवावें चित्त।। विषयासी नाहीं देऊं थारा। दया येईल रघुवीराŸ।। नाहीं देवाजवळ मागूं दुजें जाणŸ। तुमचे नामीं लागाे मनŸ।। ऐसें प्रार्थिता जाे झाला। राम कृपा करील त्याला।। नाहीं भंगूं द्यावें समाधान। रामापायीं ठेवावें मन।। लाेभ्याच्या मनांत जसें वित्त। तसें साधकाचें नामांत चित्तŸ।। एवढें ज्यानें केलें काम। त्याला नाहीं रामाचा वियाेग।।
पाण्यावांचून जसा मासा तळमळताे। तसें नामाशिवाय व्हावें मन।। एक मानावी आज्ञा प्रमाण। नाहीं याहून दुसरें साधन जाण।। साधनाच्या आटाआटी। नाहीं देह करूं कष्टी।। रामापायीं ठेवा मन। नाम घ्यावें रात्रंदिन।। रामावांचून नाहीं काेणी सखा।। त्याला नाहीं काेठें धाेका।। प्रपंची ज्याचा राम सखा। भय चिंता दु:ख नाही देखा।। राम सेवेपरते हित। सत्य सत्य नाही या जगात।। मनाने हाेऊन जावे भगवंताचे। त्याने खास केले सार्थंक जन्माचे।। सर्व कर्ता राम। हा भरवसा ठेवावा ठाम।। राम कर्ता हा ठेविता विश्वास। काळजीचे कारण उरत नाही खास।। रामरायाचे सान्निध्य राखता। भय, चिंता, शाेक यांची नाही वार्ता।। सतत करावे नामस्मरण। सर्व इच्छा राम करील पूर्ण।। नामाचे चिंतन, भगवंताचे ध्यान, गुरुआज्ञा प्रमाण। तीच गुरुपुत्राची आहे खूण।। नाहीं यावांचून दुसरें स्थान। जिथें राहे समाधान।।
रामापायीं व्हावें लीन। याहून नाहीं दुसरें लिहिणें जाण।। आतां याहून दुजे नाहीं करणें कांहीं। असा भाव ज्यानें ठेविला हृदयीं। त्याला राम नाहीं राहिला दूर।। नामाविण न मानावें हित। त्यानेंच जाेडेल भगवंत।। नामाविण मला नाहीं पाहूं काेठें। नामांतच मी भेटे असें जाणावें।। नाहीं करूं देहाचा कंटाळा। राम ठेवील त्यांत राहावें सदा। जे जे हाेतील देहाचे हाल। ते ते परमात्म्यापासून आले असे जाणावे।। नाहीं करूं काळजीला। मी नाहीं साेडलें तुम्हाला।। ज्याची वाटते महती।। त्याचेच चिंतन हाेय चित्ती।। रामावाचून न ठेवा दुजा भाव। चित्तास येईल तेथेच ठाव।। देहासकट माझा प्रपंच जाण। हा रामा तुला अर्पण। ऐसे वाटत जाणे चित्ती। कृपा करील रघुपति। सर्व ठिकाणी पाहावे रामाचे अधिष्ठान। तेणे मिळेल मनास समाधान।।