आषाढी वारीवरील माहितीपटाचा जागतिक स्तरावर सन्मान

एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अॅवॉर्डसमध्ये राष्ट्रीय विजेता घोषित

    12-Oct-2026
Total Views |

Pandharpur 
मुंबइ , 11 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
पंढरपूर आषाढी वारीचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पाेहाेचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत निर्मिती करण्यात आलेल्या ‘पंढरपूर वारी इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ या माहितीपटाची प्रतिष्ठित ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवाॅर्ड्स 2026मध्ये सर्वाेत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम श्रेणीत भारताचा राष्ट्रीय विजेता म्हणून निवड झाली. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे हे जागतिक पटलावर उमटलेले प्रतिबिंबच आहे.
 
राज्याचे वैभव असलेली पंढरपूर वारीची भ्नितमार्गातील समृद्ध परंपरा जगासमाेर आणण्याच्या उद्देशाने या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली. माहिती व जनसंपर्क विभाग आणि वाॅर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्यामार्फत निर्मित या माहितीपटाचे डिस्कव्हरीच्या जगभरातील विविध वाहिन्यांवरून प्रसारण करण्यात आले आहे.
 
राज्याच्या संतपरंपरेचा, वारकरी संप्रदायाचा आणि शेकडाे वर्षांची परंपरा असलेल्या पंढरपूर वारीचा जागतिक प्रेक्षकांना परिचय करून देण्यासाठी 22 मिनिटांचा इंग्रजीतील माहितीपट तयार करण्यात आला आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांनी दिलेला भ्नती, समता, मानवता आणि बंधुभावाचा संदेश भाषेच्या मर्यादा ओलांडून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाेहाेचवण्याच्या दृष्टीने हा माहितीपट महत्त्वपूर्ण ठरला आहे.
 
वारी ही भ्नतीमार्गातील प्राचीन परंपरा असून ती जातधर्म, गरीब-श्रीमंत असा काेणताही भेद न करता सर्वांना विठुरायाच्या रंगात रंगवून एकत्र आणते. ही महान परंपरा, तिचे उद्दिष्ट आणि विचार जगभरात पाेहाेचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाने बनवलेल्या माहितीपटाला पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मी या सर्वांचे अभिनंदन करताे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी माहिती विभागाच्या कामाचे काैतुक केले. माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह म्हणाले, की आशिया-प्रशांत क्षेत्रातील विविध देशांमधून सादर झालेल्या दर्जेदार निर्मितींमधून या माहितीपटाची भारताचा राष्ट्रीय विजेता म्हणून निवड झाली.