कां ेडित पापताप Ÿ। पाेखीत तीरींचे पादप Ÿ।
समुद्रा जाय आपŸ। गंगेचें जैसेंŸ।। (16.199)
यानंतर ज्ञानेश्वर तेज, क्षमा, धैर्य, शाैच म्हणजे शुद्धता इत्यादी गुणांचे वर्णन करीत आहेत. मरणासारखी वाईट गाेष्ट, पण पतिव्रता स्त्री पतीवरील प्रेमामुळे अग्निप्रवेश करण्यास तयार हाेते, निषेध आड येत नाही. विधीची भीड पडत नाही. अशा रीतीने परमेश्वराकडे सहज रीतीने अंत:करण ओढले जाते. त्याला आध्यात्मिक तेज म्हणतात. याेगसामर्थ्यांवर गर्व न करणे ही क्षमा हाेय. देह सर्व केसांना धारण करताे. पण त्यांचा त्याला भार नसताे. विषयसेवन हद्दीबाहेर वाढल्यावर, राेग बळावल्यावर प्रिय वस्तूचा वियाेग व अप्रिय वस्तूचा लाभ इत्यादी गाेष्टी सहन करण्यास जाे गुण लागताे ताे धैर्य या नावाने ओळखला जाताे. त्रिविध ताप प्राप्त झाले तरी हे धैर्य टिकून राहते. गडबडीचा प्रसंग आला तरी चांगला पराक्रम गाजवण्याच्या वृत्तीला धृती म्हणजे धैर्य म्हणतात. यानंतर शुचित्वाचे माेठे काव्यमय वर्णन ज्ञानेश्वर करीत आहेत. साेने शुद्ध करून त्याची घागर करावी. तीत गंगेचे पाणी भरावे यात जाे शुद्धत्वाचा गुण आहे, त्याला शुचित्व म्हणतात. कर्माचे निष्काम आचरण व अंत:करणाचा विवेक या शुचित्वाच्या मूर्ती आहेत.
ज्याप्रमाणे गंगेचे पाणी जगाचे पाप व ताप नाहीसे करीत आणि काठांवरील झाडांचे पाेषण करीत समुद्राला जाऊन मिळते, किंवा जगाचा अंधार दूर करीत, लक्ष्मीचे निवासस्थान जे कमळ त्याचा विकास करीत सूर्य प्रदक्षिणा करताे, त्याप्रमाणे अज्ञानाने बद्ध झालेल्यांना मुक्त करीत, संसारसमुद्रात बुडलेल्यांना काढीत, लाेकांचे दु:ख दूर करीत, रात्रंदिवस इतरांचे सुख वाढवीतच ज्ञानी पुरुष असताे. यानंतर अद्राेहाचे वर्णन ज्ञानेश्वरांनी केले आहे. अद्राेह म्हणजे काेणाचा द्वेष न करणे.