मध्य रेल्वेची भंगारातून ३२३ कोटींची कमाई

स्वच्छता ही सेवा मोहिमेत भंगार रूळ, स्लीपर, इंजिनांची विक्री

    12-Oct-2026
Total Views |
 
RailwayWaste
मुंबई, 11 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
मध्य रेल्वेने झिराे स्क्रॅप मिशनअंतर्गत भंगार विक्रीत माेठी कामगिरी केली आहे. आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत 323.50 काेटींच्या भंगाराची विक्री केली. त्यातही सप्टेंबरमध्ये 70.42 काेटींची विक्री नाेंदवली गेली. यार्ड, वर्कशाॅप, डेपाे आणि ट्रॅकच्या परिसरात पडून असलेले कालबाह्य साहित्य शाेधून त्याची विल्हेवाट लावण्यावर विशेष भर देण्यात आला.
 
स्वच्छता ही सेवा माेहिमेदरम्यान 17 सप्टेंबरपासून मध्य रेल्वेने 4884 टन भंगाराची विल्हेवाट लावली. या भंगाराचे मूल्य 44.24 काेटी रुपये आहे. याशिवाय चालू आर्थिक वर्षात सप्टेंबरपर्यंत 46.85 टन ई-कचऱ्याची विक्री केली असून, त्यातून 1.11 काेटींचा महसूल मिळाला. भंगार विक्रीत 29993 टन रुळ व पर्मनंट-वे भंगार, एक लाख 72 हजार 195 स्लीपर, 15547 टन लाेहयु्नत भंगार आणि 1999 टन लाेहविरहित भंगाराचा समावेश आहे. भंगार हटवल्यामुळे रेल्वेच्या यार्ड, डेपाे आणि कार्यशाळांमधील जागा माेकळी झाली असून, स्वच्छता आणि सुरक्षिततेतही सुधारणा हाेण्यास मदत झाल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. एकूण भंगार विक्रीत भुसावळ विभागाचा वाटा सर्वाधिक 57.27 काेटींचा आहे. त्यापाठाेपाठ मुंबई विभाग 52.08 काेटी, पुणे 47.55 काेटी, नागपूर 46.08 काेटी आणि साेलापूर विभागाने 14.69 काेटींची भंगार विक्री केली. उर्वरित महसूल मध्य रेल्वेवरील इतर डेपाेंमधून मिळाला.