दूध-मधाचे मिश्रण मुलांची हाडे बळकट करते

    10-Oct-2026
Total Views |

Milk
मजबूत हाेतील हाडे :
जर मुलांची लहान वयातच हाडे बळकट झाली तर त्यांना नंतर हाडांची काेणतीही समस्या हाेत नाही. दूध आणि मधाच्या मिश्रणात कॅल्शियम खूप चांगल्या प्रमाणात असते, जे मुलांची हाडे मजबूत बनवण्यास मदत करते. याशिवाय हे मिश्रण कॅल्शियमची कमतरताही दूर करते.
 
पाण्याची उणीव भरून निघेल :
मुले बहुधा पाणी कमी पितात. ज्यामुळे त्याच्या शरीरात पाणी कमी हाेते. अशावेळी मध एक असा द्रवपदार्थ असताे जाे मुलांना हायड्रेट ठेवताे. दूध आणि मधाचे हे मिश्रण मुलांच्या शरीरात इले्नट्राेलाइट्स वाढवते आणि पाण्याची उणीव भरून काढते.
 
दातांतील कॅव्हिटीचा धाेका कमी :
दातांसाठी कॅल्शियम अत्यंत फायदेशीर मानले जाते. तेच या मिश्रणात कॅल्शियम आणि फाॅस्फाेरस दाेन्ही उत्तम प्रमाणात असतात. हे दाेन्ही पाैष्टिक घटक दात बळकट करून त्यात कॅव्हिटीचा धाेका कमी करण्यास मदत करतात.
 
पचन राहील सुदृढ :
दुधात आढळारे पाैष्टिक घटक निराेगी बनवण्यास मदत करतात. जर मुलाला बद्धकाेष्ठतेची समस्या सतावत असेल तर आपण त्यांना थंड दूध पाजू शकता. याशिवय मधाने शाैच मुलायम बनवण्यास मदत करते.
ज्यामुळे बद्धकाेष्ठतेची समस्या राहत नाही.
 
एनर्जेटिक हाेतील मुले :
या मिश्रणात रायबाेफ्लेविन, व्हिटॅमिन्स असतात, जे मुलांचे खाणे एनर्जीत बदलतात. याशिवाय मिश्रणात असलेले सॅचुरेटेड फॅट मुलांना एनर्जेटिक बनवण्यात मदत करतात.
 
मुलांना असे द्यावे :
बहुतेक मुले दूध पीत नाहीत. अशा वेळी आपण त्यांना दुधात मध मिसळून देऊ शकता. जर आपले मूल सहा महिन्यांचे असेल, तर त्याच्यासाठी आईचे दूधच फायदेशीर असते.