आता मंगळावर जिवंत वीट वापरून भविष्यात घरे बांधली जाणार !

    10-Oct-2026
Total Views |

Mars 
मुंबई, 9 ऑ्नटाेबर (आ.प्र.) :
मानवाला मंगळ ग्रहावर वस्ती स्थापन करायची असल्यास, तिथपर्यंत पृथ्वीवरून अवजड बांधकाम साहित्य वाहून नेणे अत्यंत खर्चिक आणि कठीण काम आहे. दुसरीकडे, मंगळावरील माती वितळवून विटा बनवण्यासाठी अफाट ऊर्जेची गरज भासणार आहे. या गंभीर समस्येवर हाँगकाँगच्या शास्त्रज्ञांनी एक अत्यंत स्वस्त आणि जैविक ताेडगा शाेधून काढला आहे.
 
शास्त्रज्ञांनी एक विशेष जिवंत वीट विकसित केली आहे. द हाँगकाँग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नाॅलाॅजीमधील स्थापत्य अभियंता प्रा. जिशेन चियू यांच्या नेतृत्वाखाली हा यशस्वी प्रयाेग करण्यात आला आहे. या अनाेख्या विटा तयार करण्यासाठी शास्त्रज्ञांनी पृथ्वीवरील दाेन साध्या घटकांचा वापर केला आहे: जिलेटीन आणि बेकर्स यीस्ट. शास्त्रज्ञांनी या यीस्टच्या पेशींमध्ये जनुकीय बदल केले आहेत. यामुळे हे यीस्ट समुद्रातील शिंपल्यांप्रमाणे अत्यंत चिकट आणि मजबूत प्रथिने तयार करू लागते. जिलेटीन हायड्राेजेल : हे जिलेटीन यीस्टच्या पेशींना वाढण्यासाठी आणि एकत्र बांधून ठेवण्यासाठी मॅट्रिक्सचे काम करते. स्थानिक वाळू/माती : जेव्हा हे मिश्रण मंगळाच्या मातीमध्ये मिसळले जाते, तेव्हा एक जाडसर जैविक सिमेंटची पेस्ट तयार हाेते.
 
मंगळ ग्रहावरील वातावरण हे पृथ्वीसारखे नसून तिथे प्रचंड थंडी (-550 उ) आणि अत्यंत कमी वायुमंडलीय दाब आहे. शास्त्रज्ञांनी या उणे तापमानाचा आणि कमी दाबाचा वापर एक वैज्ञानिक वरदान म्हणून केला आहे. जेव्हा या पेस्टच्या साहाय्याने थ्रीडी प्रिंटरद्वारे घराचे अमूर्त माॅडेल तयार केले जाते, तेव्हा मंगळाच्या वातावरणात त्यातील पाण्याचे बर्फात रूपांतर हाेते आणि त्याचे थेट वाफेत रूपांतर हाेते. यामुळे मागे उरलेले जिलेटीन आणि यीस्टचे जाळे वाळूच्या कणांना इतके घट्ट पकडून ठेवते की, ही जिवंत वीट नैसर्गिकरीत्या कडक हाेऊन 12 मेगापास्कल इतकी मजबूत बनते, जी सामान्य हलक्या काँक्रीटच्या ताकदीइतकी आहे.
 
पारंपरिक पद्धतीने मंगळाच्या मातीला विटांचे रूप देण्यासाठी तब्बल 1,000डिग्री पेक्षा जास्त तापमानाची आणि प्रचंड साैरऊर्जेची गरज भासते.
 
परंतु, या जैविक तंत्रज्ञानामुळे एरवीपेक्षा अत्यंत कमी ऊर्जेमध्ये कामपूर्ण हाेते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, या विटांचा पुनर्वापर करता येताे. जुन्या झालेल्या विटा बारीक करून, त्यात पुन्हा थाेडे पाणी टाकून नवीन घरे थ्री डी प्रिंटरच्या साहाय्याने तयार केली जाऊ शकतात.