मुंबई, 9 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
खरीप हंगाम 2026 मधील दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्राचे आंतरमंत्रालयीन पथक राज्याच्या दाैऱ्यावर आले आहे.
11 ऑक्टाेबरपर्यंतच्या या दाैऱ्यात राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार असून, पाऊस, पीक नुकसान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याच्या स्थितीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे.
केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संयु्नत सचिव मु्नतानंद अग्रवाल या पथकाचे प्रमुख आहेत. केंद्रीय कृषी, जलसंपदा, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, अन्न व सार्वजनिक वितरण, पशुसंवर्धन, अर्थ विभाग, नीती आयाेग आणि अन्य संबंधित विभागांतील प्रशासकीय आणि तांत्रिक अधिकाऱ्यांचा या पथकात समावेश आहे.
सह्याद्री अतिथीगृहात मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या उपस्थितीत पथकाची बैठक झाली. पावसाच्या कमतरतेमुळे राज्यातील काही भागांत निर्माण झालेली पाणीटंचाई, टँकर्सची संभाव्य गरज, शेतीवर अवलंबून असलेले शेतमजूर व जमीनधारकांचे प्रश्न, मजुरांची स्थलांतराची शक्यता आणि शेतकरी आत्महत्या या बाबींकडे मुख्य सचिवांनी केंद्रीय पथकाचे लक्ष वेधले. राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने अपर मुख्य सचिव विनिता वेद-सिंघल यांनी राज्यातील पावसाची स्थिती, एल निनाेमुळे हवामान आणि पावसावर झालेला परिणाम; तसेच पिकांच्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली. पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबतही सविस्तर आढावा सादर करण्यात आला.
कृषी विभागाच्या वतीने सचिव परिमल सिंह आणि आयु्नत सूरज मांढरे यांनी राज्यातील पिकांच्या नुकसानीची आणि जिल्हानिहाय परिस्थितीची माहिती केंद्रीय पथकासमाेर मांडली. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयु्नत डाॅ. किरण पाटील यांनी जनावरांच्या चाऱ्याची सद्यस्थिती; तसेच आगामी सात महिन्यांसाठीच्या संभाव्य परिस्थितीची माहिती दिली.